ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22 - आपल्या विविध मागण्यासांठी स्टेट बँक व राष्ट्रीय बँकांच्या कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 300 कोटींचे व्यवहार ठप्प झाले. या संपात जळगाव शहरातील 800 कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे व्यापारी तसेच सामान्य ग्राहकांचे प्रचंड हाल झाले. थकीत कर्ज वसुलीसाठी संसदीय समितीची सुधारणा लागू करणे, थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदे करावे, प्रस्तावित एफडीआरआय बिल मागे घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी 22 रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. त्यानुसार जळगावात सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ शहरातील सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र आले. उपस्थित पदाधिका:यांनी मार्गदर्शन केले.
300 कोटींची उलाढाल ठप्पया संपामध्ये केवळ स्टेट बँक व राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी सहभागी झाले असले तरी खाजगी व सहकारी बँकांचे धनादेशदेखील वटू शकले नाही. जिल्हाभरातील सर्व बँकांचे धनादेश वटू न शकल्याने व इतरही व्यवहार होऊ न शकल्याने तब्बल 300 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हाभरातील राष्ट्रीय कृत बँकांसह खाजगी, सहकारी बँकांचे धनादेश स्टेट बँकेत येतात.
800 कर्मचारी सहभागीजळगावातील निदर्शनावेळी विभागीय सचिव श्याम पाटील, विजय सपकाळे, बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, मधू अहिरे, प्रसाद पाटील, संतोष कातकाडे, सुधीर पाटील, युनायटेड फोरम ऑफ बँक एम्पॉईज् युनियनचे अध्यक्ष किशोर सुव्रे, पुरुषोत्तम पाटील, विनया जोशी, राजन भावसार, सी.पी. शिंपी यांच्यासह शहरातील सर्व राष्ट्रीयकृत, स्टेट बँकेच्या एकूण 35 शाखांमधील 800 जण सहभागी झाले होते.
ग्राहकांना फटकामंगळवारी संप असल्याने अनेक ग्राहकांनी सोमवारीच बँकांचे बरीचशी कामे करून घेतली होती. मात्र धनादेश वटणे व व्यापा:यांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा मोठा परिणाम झाला.
आज पुकारण्यात आलेला संप 100 टक्के यशस्वी झाला असून यात जळगाव शहरातील 800 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. - श्याम पाटील, विभागीय सचिव.
आज पुकारलेला संप 100 टक्के यशस्वी झाला आहे. यामध्ये शहरातील स्टेट बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.- किशोर सुव्रे,अध्यक्षयुनायटेड फोरम ऑफ बँक एम्पॉईज् युनियनचे