शिंदाड, ता. पाचोरा - येथील बँक आॅफ बडोदा, दिशा कृषिकेंद्र फोडणारे व मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरांना जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.याबाबत प्राप्त माहिती अशी की, शिंदाड येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेचे चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. या सोबतच दिशा कृषिकेंद्र कुलूप तोडून ८ हजाराची चोरी केली होती. तसेच शिंदाड येथीलच मोटारसायकल चोरी व इतर परिसरातील भुरट्या चोºया, रोटोव्हेटर चोरी अशा अनेक चोºयाप्रकरणी एलसीबी पथकाने चोरीची मोटार सायकल पकडून माग काढला. यात शिंदाड येथीलच सागर विकास धनगर, सुनील उर्फ पिंटू विठ्ठल पाटील, रवींद्र अशोक जाधव या तरुणांना मध्यरात्री अटक केली. त्यांच्या सोबतअन्य साथीदारदेखील आहेत. मात्र त्यांना तपासातून सोडून दिले. सदर आरोपींकडे पथकाने विचारपूस केली असता बºयाच मोटारसायकली चोरी, व सदर चोºया केल्याचे कबूल करीत आणखी साथीदार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र अन्य साथीदार सोडून दिल्याने पोलीस कारवाईवरच संशय व्यक्त होत आहे. सदर आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सपोनि महेश जानकर, पोहेकॉ विलास पाटील, नारायण पाटील, योगेश पाटील, पोहेकॉ प्रकाश पाटील, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे, अशोक पाटील, पो.कॉ. गफूर तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. सदर आरोपींना गुन्ह्याची नोंद पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला असल्याने आरोपींना पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाचोरा येथील कोर्टात आरोपीना हजर करून२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, शिंदाड परिसरात अनेक चोºया झाल्या असून या तिघांव्यतिरिक्त अन्य आरोपी साथीदार असल्याची शिंदाड गावात चर्चा आहे. गावात अवैध दारू, सट्टा जुगार सर्रास सुरू असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.
बँक फोडणारे निघाले गावातीलच तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:14 PM