ठळक मुद्देजळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनतर्फे निवेदनआॅनलाईन औषध खरेदीद्वारे दुरुपयोगतरुणाई जातेय औषधांच्या आहारी
जळगाव : आॅनलाईन औषध खरेदी घातक ठरत असून त्यावर बंदी घालणे विचाराधीन असल्याचे अन्न व औषध प्रशासन तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.आॅनलाईन औषध खरेदीचा दिवसेंदिवस दुरुपयोग होत असून यामुळे तरुणाई वेगवेगळ््या औषधीच्या आहारी जात आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनतर्फे गुरुवारी गिरीश बापट यांच्याकडे करण्यात येऊन या विषयी त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी बापट यांनी वरील माहिती दिली.निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, उपाध्यक्ष ब्रिजेश जैन, सचिव अनिल झवर, श्याम वाणी, रुपेश चौधरी, अमीत चांदीवाल, राजेंद्र चौधरी, साहेबराव भोई, भानुदास नाईक, इरफान सालार आदी उपस्थित होते.