आॅनलाईन लोकमतसाकळी, ता.यावल,दि.३० : नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि या महिन्यात केळी भाव, केळी निर्यात, भावात चढ-उतार भाव घसरणीत ब्रेक, भाव स्थिर असे प्रकार महिनाभरात सुरू राहिले. बऱ्हाणपूर येथे तर या महिन्यात उच्च केळीच्या भावात किमान १४/१५ वेळा केळी भावात चढउतार झाली. मात्र बऱ्हाणपूर येथे कमी रास असलेल्या केळीचे भाव ६०० रुपये असे महिनाभर कायम राहिले.नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच नोव्हेंबरपासून जळगाव आणि चोपडा येथून जुनारी केळीचे भाव काढणे बंद झाले तर रावेर येथून ७ नोव्हेंबरपासून पिलबागाचे स्वतंत्र भाव काढण्यास सुरूवात झाली आणि रावेर येथून चार भाव काढणे सुरू झाले. मात्र कांदेबाग आणि पिलबागाचे भाव रावेर येथून सारखेच काढले जात आहे.दिल्ली व उत्तर भारतात धुके आणि थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने केळी निर्यातीवर परिणाम झाला. जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने केळी कापणीचे प्रमाण कमी झाले. दर्जेदार केळी (कांदेबाग) ला बोेर्डभाव फरकासहीत आॅन जास्त भाव मिळाला. शिवाय दोन अडीच महिन्यानंतर भाव घसरण थांबून कासव गतीने का होईना भाव वाढ झाली. नोव्हेंबर महिन्यात शेवटी भावात वाढ झाली खरी मात्र गेल्या २२ दिवसापासून भाव ३० नोव्हेंबर पर्यंत स्थिर राहिले.रावेर येथे फरक दोन रुपयांनी कमी होऊन १४ रुपये करण्यात आला. अर्थात भाववाढीची अपेक्षा केली जात असताना अपेक्षेप्रमाणे भाव वाढ तर झाली नाही उलट गेल्या ९ दिवसापासून भाव स्थिर आहे. रावेरसह जिल्ह्यात केळी भाव स्थिर आहे. मात्र जळगाव आणि चोपडा पेक्षा रावेर येथे कांदेबागाचे भाव जास्त आहे.
बऱ्हाणपूर येथे नोव्हेंबर महिन्यात केळी भावात चढउतार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:41 PM
रावेरसह जिल्ह्यात ९ दिवसापासून केळी भाव स्थिर
ठळक मुद्देकेळीचे भाव ६०० रुपये असे महिनाभर कायमउच्च दर्जाच्या केळी भावात किमान १४/१५ वेळा चढउतारजळगाव आणि चोपडा येथून जुनारी केळीचे भाव काढणे बंद