लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.31 : तालुक्यातील बोरी, भोकरबारी, म्हसव,े शिरसमणी, पिंपळकोठा, भोलाणे, कंकराज या लघुप्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. दरम्यान, पारोळा शहराला बोरी धरणातून पाणी पुरवठा होतो, सद्या शहराला सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असून फक्त एक महिना शहराला त्यातून पाणी पुरवठा होऊ शकतो. आगामी काळात धरणातील पाणी संपले की दुसरा पर्याय नाही, लोकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागणार आहे. पाण्याचे राजकारण ? दरम्यान, गिरणा धरणाचे पाणी बोरी धरणात टाकण्याच्या मागणीसाठी तालुक्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. तेव्हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ऑक्टोबरनंतर गिरणाचे पाणी बोरीत टाकण्याचे आश्वासन दिले होते, पण 1 नोव्हेंबर उजाडला तरी काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पाण्याचे राजकारण झाले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . कारण याबाबत अधिकारी वर्गाची देखील बैठक झाली नाही. बोरी धरणावर 40 गावे अवलंबून बोरी धरणावर शहरासह 40 गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. वेळीच गिरणा धरणाचे पाणी आले नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील पिंपळकोठा, भोलाणे धरणात मृतसाठा आहे. या धरणावर जिराळी, वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठा, शिरसोदे, बहादरपूर, महालपूर यासह इतर तीन गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. भोकरबारी या धरणावर सडावन, र}ापिंप्री, शेवगे बुद्रूक, शेळावे बुद्रूक आणि खुर्द या सहा गावांच्या पाणी योजनेचा समावेश आहे. तर शिरसमणी लघु प्रकल्पावर शिरसमणीसह चोरवड, सुधाकरनगर ही तीन गावे अवलंबून आहेत. सर्व लघु प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा आहे. त्यामुळे आगामी काळातील चिंता आतापासूनच सतावत आहे. तालुक्यातील खेडीढोक, नेरपाट जिराळी या तीन गावांना पाण्याचे टँकर सुरु आहेत तर मोहाडी, दहीगाव मंगरूळ, कंकराज या गावांना टँकर सुरु करण्यासाठी पंचायत समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . पुन्हा पाठविले स्मरणपत्र दरम्यान, बोरी धरणात गिरणा धरणाचे पाणी तात्काळ टाकून जलसंकटावर मात करण्यासंदर्भात आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिका:यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. त्यामुळे आता कधी गिरणाचे पाणी बोरीत टाकतात या कडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
पारोळा तालुक्यात धरणांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 10:49 PM
लहान मोठय़ा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने तालुक्यासह पारोळा शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देगिरणा धरणाचे पाणी बोरीत टाकण्याच्या मागणीसाठी आमदारांनी केले होते उपोषणजलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पुर्तता नाहीतीन गावात टँकरने पाणी पुरवठा, चार गावांचा प्रस्ताव पाठविला