शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:53 PM

कमी पावसामुळे उत्पादन घटून दर्जावरही परिणाम

ठळक मुद्देतीन वर्षानंतर तांदळाच्या भावात वाढतांदळाचा पेरा कमी

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - पावसाचे कमी प्रमाण व त्यातही मध्येच उघडीपमुळे तांदळाच्या उत्पादनात घट होऊन तीन वर्षानंतर तांदळाच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. यामुळे बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे.गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा सर्वच पिकांवर परिणाम झाला. मात्र तांदळाला सलग १०० दिवस पाणी आवश्यक असते, अशात मध्येच पावसाने वारंवार उघडीप दिल्याने तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. या सोबतच दर्जावरही याचा परिणाम जाणवत आहे.एरव्ही साधारण डिसेंबर महिन्यापासून नवीन तांदळाची आवक सुरू होते. मात्र त्याची जास्त खरेदी उन्हाळ््यात धान्य खरेदी करीत असतानाच होते. यंदा एप्रिलपासून धान्य खरेदी वाढण्याचे चिन्हे असताना तांदळाचे भाव वाढले आहेत.तांदळाचा पेराही कमीकोणत्याही पिकाचे भाव कमी झाल्यास साधारण तीन वर्षानंतर ते पुन्हा वाढतात, असे निसर्गचक्रच आहे. गेल्या तीन वर्षांपासून तांदळाला भाव कमी मिळत असल्याने तांदूळ उत्पादकांनी यंदा तांदळाचा पेराही कमी केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात पावसाचा परिणाम झाला.देशभरात सर्वत्र परिणामजळगावात विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसर या भागासह पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, कर्नाटक येथून तांदूळ येतो. यंदा या सर्व भागात पावसाचा परिणाम झाल्याने आवकही साधारण २० ते ३० टक्यांनी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जळगावच्या बाजारपेठेत यामुळे बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. गेल्या वर्षी १०५ रुपये किलोवर असलेल्या बासमती तांदळाचे भाव यंदा १२० रुपयांवर पोहचले आहेत तर चिनोर व इतर तांदळाचे भाव ३० ते ३२ रुपयांवरून ३५ ते ३६ रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे ६० रुपये असो की ७० रुपये प्रति किलो सर्वच तांदळाचेही भाव चार ते पाच रुपये प्रति किलोने वाढले आहेत.जागतिक पातळीवर दर्जा मागे पडलायंदा भारतात पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने ब्रह्मदेश, पाकिस्तान, थायलंड या तांदूळ उत्पादक देशांच्या तांदळाच्या दर्जाच्या तुलनेत भारताचा तांदूळ यंदा मागे पडत असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी