जळगाव : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील मैला वाहून नेणाºया मनपाच्या एका वाहनाच्या कॅबीन मध्ये बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामध्ये वाहन चालक व मैला वाहणारे दोन कर्मचारी बालंबाल बचावले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजता मास्टर कॉलनी परिसरात घडली. यामध्ये चालक साहब सैय्यद हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मात्र, एकच खळबळ उडाली होती़अशी घडली घटनामास्टर कॉलनी भागात दुपारी दैनंदिन कामानुसार मनपा वाहन विभागाचे एम.एच.१९, एम.९२०० या क्रमांकाचे वाहन स्वच्छतागृहांमधील मैला वाहून नेण्यासाठी गेले होते. या ठिकाण मैला जमा केल्यानंतर वाहनाच्या कॅबीनमध्ये वाहन चालकासह दोन कर्मचारी देखील उपस्थित होते. वाहन काही मीटर अंतरावर गेल्यानंतर अचानक ते बंद पडले. चालक वाहन सुरु करण्याचा प्रयत्न करत असतानाच वाहनाच्या कॅबीनमध्ये असलेल्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता.तिघांना श्वास घेण्यास अडचणकॅबीनमध्ये धुरामुळे वाहन चालक व कर्मचाºयांना कॅबीनचा दरवाजा उघडता येत नव्हता. यामुळे तिघांना श्वास घेण्यास अडचण येत होती. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ वाहनाच्या कॅबीनचा दरवाजा तोडून तिघांना सुरक्षित कॅबीनमधून बाहेर काढले. हाच प्रकार वर्दळ नसलेल्या रस्त्यावर झाला असता तर तिघा कर्मचाºयांचा जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनपा वाहन विभागाचे बाळासाहेब लासुरे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली. तिन्ही कर्मचाºयांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती मनपा वाहन विभागाकडून देण्यात आली.
जळगावात मनपा वाहनात बॅटरीचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:36 AM