शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीडीओंनी वैद्यकीय शिक्षण लावले सार्थकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 4:06 PM

कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली अमृतपेय आयुर्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावले आहे.

ठळक मुद्देसंडे हटके बातमीरावेर : आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पं.स.शेष फंड व दात्यांच्या योगदानातून उभारताय दीड लाख रुपये निधी

किरण चौधरीरावेर : कोरोनाच्या महामारीत कोरोना बाधित रूग्णांची आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा बजावणाºया तालुक्यातील सुमारे एक हजार वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशावर्कर या कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली अमृतपेय आयुर्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावले आहे.गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांचा राजकीय दबावाला बळी न पडता शिस्तबद्ध प्रशासनाचा नावलौकिक आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीत ग्रामसेवकांची भूमिकाही निर्णायक ठरली आहे.त्यांची कार्यतत्परता व प्रशासनाची चुणूक दाखवताना त्यांनी गटविकास अधिकारी पदावरून लोकसेवा बजावताना आपल्या बीएएमएस या वैद्यकीय शिक्षणाचा वेळोवेळी अलौकिक वापर करून गटविकास अधिकारी रूपातील डॉक्टर असल्याची तालुक्याला अनुभूती यापूर्वीही अनेकदा दिली आहे.कोरोना महामारीच्या आधी लालमाती आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सिकलसेलने मृत्यू झाला असताना तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी लागणारे किट शासनाकडून उपलब्ध झाली नव्हती. तेव्हा त्यांनी तालुक्यातील आश्रमशाळांसह जि.प.प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्याची किट उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या शेषफंडातून एक लाख रुपयांचा निधी विशेष हक्क राखून वर्ग केला होता.दरम्यान, केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या आयुर्वेदिक हर्बल्स व औषधींचा उकाडा असलेले अमृतपेय आयुर्वेदिक औषधी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात येवून संस्थात्मक विलगीकरण केलेल्या सहा हजार २१० संशयित रूग्णांनी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सतत सात दिवस सेवन केल्याने त्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.त्या डॉ.नाकाडे यांनी आपल्या आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षणाची कास धरून कोरोना नियंत्रणासाठी जीव धोक्यात घालून वावरणाºया २५५ आशा वर्कर, ३१८ अंगणवाडी सेविका व ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संशमनी वटी दोन गोळ्या २ वेळा व अनुतेल नस्य २ - २ थेंब ही आयुर्वेदिक अमृतपेय औषधी वितरीत करण्याचा प्रस्ताव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे ठेवला होता. त्यास त्यांनी मंजुरी दिल्याने डॉ.नाकाडे यांनी पंचायत समिती शेष फंडातून ५० हजार रू.चा निधी उभारला आहे. जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पं.स.सभापती जितेंद्र पाटील यांच्यासह अनेक दात्यांनी दीड लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी दातृत्वाचे हात पुढे केले आहेत.तालुक्यातील कोरोना वॉरीयर्ससह ग्रा.पं.कर्मचाºयांना संबंधित ग्रा.पं.नी आपापल्या ग्रामनिधीतून आयुर्वेदिक अमृतपेय उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश पारीत केल्याची माहिती त्यांनी दिलीे. कोरोना वॉरीयर्सचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या त्यांच्या या संकल्पनेचे समाजमनातून कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर