मोहन सारस्वत/लियाकत सय्यदजामनेर, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसलेल्यांमध्ये कोरोनाची भीती, चिंता, दु:ख वाटते. कधी चिडचिडही होते. घरातील व्यक्तीची ही चिडचिड होते किंवा फोनवर आजाराबद्दल चर्चा होते. अशा वेळी बालमनावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे व त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.मुलांनी प्रश्न विचारले तर त्यांना रागावू नका किंवा चिडचिडही करू नका. शांतपणे आपणास याविषयी जेवढी माहिती आहे ती सोप्या शब्दात सांगा. त्यांच्या शंकांचे निरसन करा. याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत सांगून त्यांना आश्वस्त करा. मुले जर प्रश्न विचारण्याइतके मोठे नसतील तर त्यांच्या वागण्यात बदल झालेला आपणास दिसून येईल. अशा वेळी जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवावा. त्याच्यासोबत बालपणीचे खेळ खेळा. मुलांचे छंद कोणते आहेत? कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे ते हेरून कलागुणांना वाव देऊ शकतो.कॉलनी परिसर, नातेवाईक, मित्र मंडळ यांच्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित करा. मुलांना डानसिंग, योग, सोप्या हालचाली शारीरिक व मानसिक व्यायाम करून घेतल्यास आपण त्यांना व्यस्त व तंदुरुस्त ठेवू शकतो.लहान मुलांना सर्दी, पडसे किंवा ताप यासारखे आजार होऊ शकतात. त्यावर आपल्या डॉक्टरांकडून वेळीच सोशल डिस्टनसिंग किंवा व्हाट्सअॅपच्या किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वेळीच उपचार करून घ्यावा, असेही डॉ.सोनवणे यांनी स्पष्ट केले.
कोरोना आजाराबाबत बालमनावरील परिणामांची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 2:20 PM
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसलेल्यांमध्ये कोरोनाची भीती, चिंता, दु:ख वाटते. कधी चिडचिडही होते. अशा वेळी बालमनावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे व त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.
ठळक मुद्देसंडे स्पेशल.....डॉ.राजेश सोनवणे यांचा ‘लोकमत’शी संवादकॉलनी परिसर, नातेवाईक, मित्र मंडळ यांच्या ग्रुपवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित कराआपल्या डॉक्टरांकडून व्हाट्सअॅपच्या किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वेळीच उपचार करून घ्या