जळगाव : सुप्रीम कॉलनी परिसरात तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. शाहरुख सादिक खाटीक व मिर्झा शोएब युनुस (दोन्ही रा. आझाद नगर, पिंप्राळा) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
सुप्रीम कॉलनी परिसरात एका युवकास काही तरुण मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ १० मार्चला व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी व्हिडिओतील तरुणांचा शोध सुरु केला. अखेर शुक्रवारी ज्या युवकाला मारहाण झाली, त्याचे दिनेश मदन चव्हाण (रा. श्रद्धा कॉलनी) असे नाव निष्पन्न झाले. तर त्याला शाहरुख सादिक खाटीक व मिर्झा शोएब युनुस, जुबेर शेख सलीम (रा.शिवाजीनगर) या तिघांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली. यातील शाहरुख सादिक खाटीक व मिर्झा शोएब युनुस या दोघांचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे.