जळगाव : भीक मागितली म्हणून दहा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात झारा मारून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार रविवारी समोर आला. आईजवळ पैसे नसल्याने तिने मुलीवर घरीच उपचार केले. मात्र जखम मोठी असल्याने रात्रभर त्यातून रक्तस्त्राव होत राहिला. या प्रकाराद्दल पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली. मात्र पोलिसांनी झारा मारणार्या विक्रेत्यावर केवळ अदखपात्र गुन्हा दाखल केला आहे.टिचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी माणूस स्वत:शीच झगडत असतो. या झगड्यात त्याला माणूसकी जपणारे माणसं भेटतात. आणि त्याची आयुष्यासोबत सुरू असलेली झुंज सहज सोपी होते. मात्र काहींच्या नशिबी झगडा हा कायम असतो. परिस्थितीवर मात करणं त्यांचं कधीच स्वप्न नसतं. मात्र वेळ निभाऊन नेण्याचे पर्याय त्यांना माहित असतात. भीक मागणे असाच एक पर्याय निवडलेल्या पाळधी येथील गरिब कुटुंबातील पूजाला (१0 वर्षे) इडली-सांबार विक्रेता प्रकाश तुकाराम सपकाळे, असोदा याने भीक मागितली म्हणून झारा मारून फेकला.
तुझ्याकडून होईल ते कर...
सोमवारी नुकसान भरपाई मागण्यासाठी विक्रे त्याकडे मुलीची आई गेली असता, जखम किरकोळ आहे. मुलीला काहीही झालेले नाही. मला पैसे मागू नको. तुझ्याकडून होईल ते कर. असे आरोपीने (विक्रेत्याने) तिला सांगितले. न्याय मिळेल म्हणून या महिलेने पोलिसांकडे रविवारी धाव घेतली आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली.केवळ अदखलपात्र गुन्हागंभीर जखमी झालेल्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवूरन पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विक्रेत्याला दम दिला असून तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका, असे आईला ठासून सांगण्यात आले आहे