लोकमत आॅनलाईनधानोरा, दि.१७ : धानोरा ग्रामपंचायतीला महिलांनी कुलूप लावल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधीत तडवी आणि चर्मकारवाडा भागात नवीन पाईप लाईन टाकण्याच्या कामास सुरू केली आहे.शनिवारी सकाळी ९ वाजेला सरपंचासह सदस्यांनी या वाडयात उपस्थिती देवून सद्या पाणीपुरवठा होत असलेली पाईपलाईन बंद करून नवीन पाईप टाकण्यासाठी लागलीच काम सुरू करण्यात आले.दरम्यान, येथील नविन पाईपाचे १० नविन बार बदलविण्यात आले आहेत. या भागात गेल्या महिनाभरापासून दुषित पाणीपुरवठा होतो आहे, तसेच या दोन्ही वाडयाजवळ महिला शौचालय असून त्याच्या दुर्गंधीने हा परिसर त्रस्त असल्याच्या तक्रारी होत्या.याबाबत तोंडी व लेखी तक्रारी ग्रामपंचायतकडे करण्यात येऊनही त्याची दखल घेतलेली नसल्यामुळे शुक्रवार, दि. १६ रोजी येथील तडवीवाड्यातील महिला- पुरुषांनी दुपारी ४ वाजता ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीस कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला होता. दरम्यान, या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईप लाईनच्या कामास सुरुवात होवून महिला शौचालयाच्या दुरूस्तीच्या कामाचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीला ठोकलेल्या कुलूपाची चावी सरपंचांना देण्यात आली. यावेळी अडावद पो . स्टे. चे बीट हवालदार रविंद्र साळुंके , विठ्ठल धनगर यांच्या उपस्थितीत सरपंच कीर्ती पाटील यांनी ग्रामपंचायतीचे कुलूप उघडले. या वेळी किरण पाटील व उपसरपंच अशोक साळुंके आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
धानोºयात अखेर नवीन पाइपलाईन टाकण्याच्या कामास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 8:36 PM
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील तडवी आणि चर्मकारवाड्यात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून येथील रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होऊन शनिवारी पाइपलाइन टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी समस्याग्रस्त भागात केली पाहणी महिला शौैचालयाच्या दुरूस्तीचेही आश्वासनपोलिसांच्या उपस्थितीत सरपंचांनी उघडले ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप