शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

जळगावात महापौरपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:57 PM

जळगाव मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमहापौरपदाची पहिली संधी मिळण्यासाठी भरइच्छुकांकडून नगरसेवकांची जुळवा-जुळवउपमहापौर तसेच स्थायी समितीसाठीही ‘फिल्डींग’

जळगाव : मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे. तर ऐनवेळी पक्षाच्या आदेशानुसार इतर नावाला देखील महापौरपदासाठी अंतीम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, विभागीय आयुक्तांकडून महापौर किंवा उपमहापौर निवडीसाठी कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. साधारणपणे १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान, महापौरपद निवडीसाठी विशेष महासभा होण्याची शक्यता आहे. त्याआधी महापौरपदासाठी भाजपामध्येच रस्सीखेच सुरु झाली आहे.इच्छुकांकडून पक्षनेतृत्वावर महापौरपदासाठी दबाव टाकण्यासाठी नगरसेवकांचे समर्थन प्राप्त करण्यासाठी धावपळ सुरु आहे. सीमा भोळे यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्यासाठी त्यांचे पती व शहराचे आमदार सुरेश भोळे हे आग्रही आहेत. तर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे या देखील या स्पर्धेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या कैलास सोनवणे यांच्याकडून सुरुवातीपासून महापौरपदासाठी दावा ठोकला जात आहे. यासाठी त्यांनी काही नगरसेवकांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सिंधूताई कोल्हे या ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांना देखील पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.महापौरपदासाठी वाढणाऱ्या स्पर्धेमुळे पक्ष नेतृत्वाकडून काही इच्छुकांना सम-समान संधी दिली जाण्याची शक्यता. मात्र, यासाठी देखील स्पर्धा सुरु असून पहिली संधी मिळण्यावर इच्छुकांचा भर आहे. इच्छुकांकडून काही नगरसेवकांना आपल्या बाजुने करून वरिष्ठांशी याबाबत बोलणी देखील सुरु केल्याचे समजते.महापौरपदासह उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठीही इच्छुकांकडून ‘फिल्डींग’ लावली जात आहे. उपमहापौर पदासाठी भगत बालाणी, सदाशिव ढेकळे यांचे नाव आघाडीवर असून, स्थायी समिती सभापतीसाठी आश्विन सोनवणे, शुचीता हाडा यांचे नाव आघाडीवर आहे. यासह स्विकृत नगरसेवक पदासाठीही हालचाली सुरु आहेत.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकMuncipal Corporationनगर पालिका