लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णवाढीने नववर्षाची सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ६० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण नोंदविण्यात येत असल्याने आता चिंतेतही भर पडली आहे. शुक्रवारी ६६ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, बाधितांचे प्रमाण हे ५.९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. शुक्रवारी आरटीपीसीआरचे ७४६ तर ॲंटिजनचे ३६० अहवाल प्राप्त झाले असून, त्यात ६६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णवाढ समोर येत असल्याने त्याचे आता वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. वाढणारी थंडी हे त्यातील एक कारण समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. आगामी तीन ते चार दिवसांत थंडीत वाढ झाल्यास दिवसाला शंभर रुग्ण समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरात शुक्रवारी २२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
तीन दिवसांत वाढली पॉझिटिव्हिटी
३० डिसेंबर- रुग्ण - ८०, प्रमाण - ४.६३ टक्के
३१ डिसेंबर : रुग्ण - ६०, प्रमाण - ५.३५ टक्के
१ जानेवारी : रुग्ण- ६६ , प्रमाण - ५.९७ टक्के