शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजनेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 3:20 PM

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यास सुरुवात झाली असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी करण्यात आली.

ठळक मुद्देबांधकाम कामगार नोंदणी जागृती अभियान राबविण्यास प्रारंभबांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी१९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०१८ पर्यँत विशेष नोंदणी अभियान असेल

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यास सुरुवात झाली असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी करण्यात आली.अटल विश्वकर्मा सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती व्हावी, नोंदणी कशी व कुठे करावी, काय-काय लाभ या योजनेतून मिळतात, याकरिता अनुलोम संस्थेमार्फत बांधकाम कामगार नोंदणी जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात सरकारी कामगार अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी अनुलोमचे मुक्ताईनगरचे भाग जनसेवक दिनेश चव्हाण यांच्याकडे बांधकाम नोंदणी अर्ज सुपूर्द करून केली. या वेळी टाकळी येथील २६ इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०१८ पर्यँत विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. या योजनेत २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे गेल्यावर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकचे सत्यप्रत, पासपोर्ट छायाचित्र लागते. या अभियानातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यावर भर देण्यात येत आहे.यावेळी सहायक नोंदणी अधिकारी अ.फु.चव्हाण, अनुलोम रावेर उपविभाग जनसेवक मनोज महाजन उपस्थित होते. अभियान यशस्वीतेसाठी अनुलोम वस्तीमित्र राजू चव्हाण, स्थानमित्र जितेंद्र जाधव, राहुल जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर