जळगाव : पिंप्राळा व परिसरातील सुमारे 4 लाख नागरिक ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजाडला. पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्यानजीक 2 बोगदे तयार करण्यासाठी मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत शुभारंभ करण्यात आला. बुधवारपासून प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. 9 महिन्यांची मुदत मक्तेदाराला देण्यात आली असली तरी 5 महिन्यात दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण करण्याचा मक्तेदाराचा प्रय} राहणार आहे. या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी दूर होणार असून पिंप्राळा परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. आज झाडे तोडून खोदकामास सुरुवात होणारमंगळवारी दुपारी बजरंग पुलानजीक भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त जीवन सोनवणे, माजी उपमहापौर रमेशदादा जैन, सुनिल महाजन, संदेश भोईटे, अमर जैन, श्यामकांत सोनवणे, दिपाली पाटील व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोगद्याच्या जागेची आखणीही करण्यात आली. बुधवारी बोगद्यासाठी अडसर ठरणारी तीन झाडे तोडली जाणार आहे. त्यानंतर खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. 4 लाख नागरिकांचा प्रश्न मार्गी लागेलशहरातील रेल्वेमार्गावर असलेला बजरंग बोगदा प्रेम नगर, एसएआयटी कॉलेज, मुक्ताईनगर, पिंप्राळा व महामार्गाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण आहे. मात्र तो अरुंद असल्याने व तेथून सांडपाणी व पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असते. तसेच पिंप्राळा रेल्वेगेट देखील अनेकदा बंद असते. यामुळे या ठिकाणी देखील वाहतुकीचा खोळंबा होत असतो. मात्र नवीन बोगदे तयार होत असल्याने ही समस्या आता मार्गी लागणार आहे. 9 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेचे अभियंते चिन्मय यादव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.दररोज 16 ते 18 तास कामबुधवारपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून, नऊ महिन्यात या बोगद्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी रेल्वेचे कर्मचारी दररोज 16 ते 18 तास काम करणार असल्याची माहिती रेल्वेचे अभियंते चिन्मय यादव यांनी दिली. 3 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीतून दोन नविन बोगदे बांधण्यासाठी निविदा प्रकीया पूर्ण करून त्यानुसार आता कायार्देश दिल्यानतंर या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पादचा:यांसाठी स्वतंत्र व्यवस्था बोगद्यातून पाचा:यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दोन्ही बोगद्यांमध्ये 1 मीटरचा फुटपाथ तयार करण्यात येणार आहे. त्या फुटपाथ खालून गटारीची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरुन त्यातून पाणी वाहून जाईल. पिंप्राळा परिसरातील अनेक कॉलन्यांमधील रहिवाशांचे हाल थांबावे, यासाठी दोन बोगदे तयार करण्यात यावे, यासाठी प्रय} केले. अखेर आज या कामाचा शुभारंभ झाला. 9 महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र त्यापूर्वीच ते काम पूर्ण होईल. -संदेश भोईटे, नगरसेवक.
बजरंग बोगद्यांच्या कामास अखेर प्रारंभ
By admin | Published: February 15, 2017 1:06 AM