(फोटो- ०८सीटीआर २७)
जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा जळगाव यांच्या विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुकुंद सपकाळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर मुकुंद सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन रमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला दिलीप सपकाळे, चंदन बिहाडे, अमोल कोल्हे, सुखदेव नाथ, संजय सपकाळे, मोतीलाल पाटील, भारत सोनवणे, श्रीकांत मोरे, दिगंबर सोनवणे, राही खैरनार, के. टी. ठाकूर, आकाश सपकाळे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.