रावेर - राज्याच्या सर्वोच्च विधानसभा सभागृहात पारदर्शकता मांडणारे भाषण करून विश्वासार्हता वाढली आहे. सभागृहात व या महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलण्यासाठी धाडस लागते. पण शासनाच्या माध्यमातून कोणी एक शब्द बोलले नाही याची खंत वाटते. कुणाची आवडती वा नावडती राणी असते पण आपण राजा आहोत. एटीएस, आयकर विभागाच्या चौकश्या लावल्या. चोर्या केल्या की चपाट्या केल्या. एवढे भुक्कड आम्ही नाहीत. विखे पाटील आले तर या. या अन् आम्ही आलो तर चल फूट्टं. अरे कुणी तिकीट देवो की ना देवो ही पब्लिक नाथाभाऊंच्या मागे आहे.हितचिंतक म्हणतात तिथे राहू नका. एवढा अपमान सहन कशाला करता. अन् जर ही जनतेची इच्छाचं असेल तर जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. इथे काही कुणी कुणाचे धरले बांधलेले नाहीत एवढे असल्यावरही मी म्हणतो भाजपलाच जास्तीत जास्त ४० हजार नव्हे तर ८० हजार मताधिक्याने विजयी करून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना चपराक द्या असा घणाघाती हल्ला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी चढवला. रावेर विधानसभा कार्यकर्त्यांच्या विस्तृत चिंतन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले नाथाभाऊंची अवहेलना वा अपमान झाला असला तरी नाथाभाऊं पक्षासाठी काम करणार आहे.आजपर्यंत पक्ष व जनतेच्या विकासासाठी काम करीत आलो. वैयक्तिक स्वार्थासाठी किती कंपन्या व किती कॉलेजेस उघडता आले असते. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी १३ महिन्यात किती कॉलेज उघडले? मात्र ते डोनेशन कमावणे आपल्याला जमत नाही अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रात काहीही होऊ द्या. या नाथाभाऊला बाहेर होवू द्या, तुम्हाला ते घरात घुसून मारतील.कारण कार्यकर्ते हीच नाथाभाऊंची ताकद आहे. आपल्या भागाचे नुकसान झाल्याचे शल्य आहे. आपल्या भागातील मंजूर झालेले इंजिनियरींग कॉलेज, हॉर्टीकल्चर कॉलेज गेले या नुकसानीचे शल्य आहे. एवढे झालेवरही मी म्हणतो भाजपल मत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. काय आम्ही चोरी - चपाटी केली की रंडीबाजी केली, जे करताय ते तुमच्यासोबत आहेत. अन्याय, अत्याचार झालेत.तरीही मी माझ्या वाढवलेल्या पक्षाचे झाडाला तोडणे मला आवडत नाही.म्हणून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना ४० हजारापेक्षा ८० हजाराचे मताधिक्य मिळवून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना चपराक देत नाथाभाऊंची किंमत कळू द्या असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी आमदार हरिभाऊ जावळे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प सभापती सुरेश धनके, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, रावेर पं स उपसभापती अनिता चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजप तालूकाध्यक्ष सुनिल पाटील, माजी सभापती मिलींद वायकोळे, जि प सदस्य कैलास सरोदे, रंजना पाटील, नंदा पाटील आदी उपस्थित होते.