नांदेड, ता.धरणगाव, जि.जळगाव : येथील गुलाबवाडी भागातील पात्र घरकुल कुटुंबांनी जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. भूमी अभिलेख कार्यालयाकडून गट मोजणीचा अहवाल प्राप्त झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.नांदेड येथील गुलाबवाडी भागातील ४५ पात्र कुटुंबीयांना घरकुले मंजूर झालेली आहेत. परंतु गुलाबवाडी हा भाग पूरग्रस्त क्षेत्रात येत असल्यामुळे घरकुलांसाठी दुसरीकडे जागा देण्यात यावी, अशी त्या भागातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार त्यांना १२ फेब्रुवारी २०१८ ला गावालगतचा एक गट ग्रामसभेने दिलेला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली होती. त्यानुसार ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांनी त्वरित मोजणी फीदेखील भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरलेली होती. तरीदेखील भूमी अभिलेख कार्यालयाकडून गट मोजणी अहवाल सादर केला जात नव्हता. म्हणून गुलाबवाडी भागातील २० पुरुष व महिला जिल्हा जागृत मंचचे शिवराम पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. भूमी अभिलेख उपअधीक्षक अहिरे यांनी गटमोजणी अहवाल उपोषणस्थळी हजर केल्याने उपोषण ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांच्या हस्ते लिंबू पाणी देवून उपोषण सोडण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील नांदेडमधील घरकुल लाभार्र्थींचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 3:47 PM
गुलाबवाडी भागातील पात्र घरकुल कुटुंबांनी जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
ठळक मुद्देजागा मोजणी अहवाल सादर केल्याने समाधानमहिलांसह पुरुष बसले होते उपोषणाला