पहूर, ता. जामनेर : अधिपरीचारक मारहाणीच्या निषेधार्थ तीन दिवसांपासून सुरु असलेले येथील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन व दोन वैद्यकीय अधिकाºयांचे राजीनामे आरोग्य संचलकांच्या मध्यस्थीने सोमवारी मागे घेण्यात आले असून मंगळवारपासून रुग्णालयाची रुग्णसेवा पूर्ववत सुरू होत आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने आरोग्य संचालक पट्टनशेट्टी यांनी पत्रपरिषदेत दिले.कराड यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शनिवार पासून रुग्णालयातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू होते. यामुळे आरोग्य संचालक डॉ. पट्टनशेट्टी व जिल्हा शल्यचिकित्सक एन एस चव्हाण यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात येऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. उपस्थित असलेले रामेश्वर पाटील, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, समाधान पाटील याच बरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, डॉ. संदीप कुमावत, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मंजुषा पाटील यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर आरोग्य संचालक डॉ. पट्टनशेट्टी म्हणाले अधिपरीचारका विरुद्ध दाखल खोटा दाखल गुन्हा मागे घ्यावा., यामुळे वैद्यकीय अधिकार्यांचे व कर्मचाºयांचे मनोबल खचले आहे. तर दोन वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेले राजीनामे स्विकारले नाही. त्यांनी ही समाजमन ओळखून रुग्णसेवेला सुरवात करावी. संबधिताविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी व राजकीय पदाधिकाºयांनी डॉक्टरांना सहकार्य करावे. व रुग्णालयाची रुग्णसेवा अखंडित ठेवावी, असे आवाहन केले. तर जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी रुग्णालयात एक पोलीस चौकी देण्याचा प्रस्ताव यावेळी मांडला आहे.जलसंपदा मंत्र्यासाठीराजीनामा मागेडॉ. हर्षल महाजन व डॉ. मंजुषा पाटील यांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते. सोमवारी स्वत: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमनध्वनीवर या दोन डॉक्टरांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही आमचा राजीनामा मागे घेत असल्याचे डॉ. मंजुषा पाटील यांनी सांगितले आहे.
पहूर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:40 PM