शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

लोकसहभागातून ‘बेलगंगे’च्या सहा शाळा झाल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 4:24 PM

बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वाघडू, बोरखेडा, वडाळा, प्रिंपी, बेलगंगा व कोठली या सहा माध्यमिक शाळा लोकसहभागातून १०० टक्के डिजिटल शाळा झाल्या आहेत.

चाळीसगाव, जि.जळगाव : बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वाघडू, बोरखेडा, वडाळा, प्रिंपी, बेलगंगा व कोठली या सहा माध्यमिक  शाळा लोकसहभागातून १०० टक्के डिजिटल शाळा झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी यांच्या गुणवतेत निश्चित वाढ होईल, असा सूर २३ रोजी वाघडू येथे झालेल्या कार्यक्रमात निघाला.अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक शंकर बारकू पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एम. के. पाटील, उद्योजक सुयोग जैन, विश्वस्त प्रा.एस.डी.पाटील, एल.टी. पाटील, जीभाऊ पाटील, देवराम पाटील, आर.सी.पाटील, नाना ढगे, आबा पाटील, उपसरपंच मधुकर पाटील, व्यंकटराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील भालेराव यांनी केले. दीपप्रज्वालन व सरस्वती पूजन प्रमुख अतिथींनी केले. उद्योजक सुयोग जैन म्हणाले की, अनेक लोक मंदिरासाठी देणगी, वर्गणी गोळा करतात हे आपण ऐकले आहे परंतु, ज्ञानमंदिरासाठी जनतेतून पैसा उभा केल्यामुळे भावी पिढी अधिकाधिक शिक्षित होऊन त्यांच्या आयुष्याला टर्निंग पार्इंट मिळणार आहे. त्यामुळे मदत करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.एम.के.आण्णा पाटील म्हणाले की, या शाळांमध्ये डिजिटल साधनांचा वापर होऊन इ-लर्निंगसह विविध सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण विध्यार्थी आता गुणवतेत मागे पडणार नाही. त्यामुळे तो शहरातही जाणार नाही.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल आबा पाटील, प्रा.एस.डी.पाटील, व्यंकटराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, पालक, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव