जळगाव : सोमवारी शहरातील ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेतील ही नीचांकी रुग्णसंख्या आहे. पाच पटीने अर्थात ३५ रुग्ण बरे झाले असून ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४८१ वर आली आहे. ग्रामीण भागातही रुग्ण घटले असून ५ नवे रुग्ण तर ११ जण बरे झाले आहेत. मृतांमध्ये जळगाव शहरातील ५२, ७० वर्षीय पुरुष व ७६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर रावेर तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यू रोखणे हे यंत्रणेसमोरील आव्हान मात्र कायम आहे. शहरातील रुग्णसंख्या गेल्या दोन आठवड्यांपासून शंभरापेक्षा कमी नोंदविण्यात येत होती. नंतर ती ५० पेक्षा कमी झाली होती. शहरातील बाधितांचे प्रमाणही दीड टक्क्यावर आले आहे.