आडगाव, ता एरंडोल, जि.जळगाव : गुलाबी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित शेतकºयांना उर्वरित अनुदान देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे आता शेतकºयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२०१७-१८ या वर्षात गुलाबी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले होते. शासनाने जाहीर केलेल्या अनुदानातून एरंडोल व पारोळा तालुक्यातील ३३ टक्के अनुदान वजा करून वाटप केले. यामुळे ७० हजार शेतकरी उर्वरित अनुदानापासून वंचित होते. यासंदर्भात शेतकºयांनी अनेक वेळा निवेदन दिली, आंदोलने केली. पण सरकारने दाद दिली नाही. शासनाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेवटी आडगावच्या शेतकºयांनी खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती.एरंडोल व पारोळा तालुक्यातील ७० हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. खंडपीठाने शेतकºयांची बाजू समजून घेऊन शेतकºयांच्या बाजूने निकाल दिला. खंडपीठाचे न्यायाधीश एस.व्ही. गंगापूरवाला व अविनाश घारोटे यांनी हा निकाल दिला. ही याचिका आडगाव येथील शेतकरी शांताराम नामदेव पवार, भगवान भीमराव चौधरी, उत्तमराव परशराम पाटील यांनी दाखल केली होती.सन २०२० या वर्षात या याचिकेचा निकाल लागला. एरंडोल तालुक्यातील २९ हजार ६४७ आणि पारोळा तालुक्यातील ४० हजार ६९२ शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे.
गुलाबी बोंडअळी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा खंडपीठाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 1:15 AM
गुलाबी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित शेतकºयांना उर्वरित अनुदान देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
ठळक मुद्देएरंडोल व पारोळा तालुक्यातील ७० हजार शेतकऱ्यांना फायदाआता शेतकºयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा