लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम टपाल ख्यात्यामार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आदेश दिले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आवश्यक आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय. घेतला आहे