ऑनलाईन लोकमत
तळोदा,दि.8 : घरकुल आवास योजनेच्या नावाखाली लाभाथ्र्याकडून प्रत्येकी दीडशे ते पाचशे रुपये घेऊन फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी शहरात उघडकीस आला आह़े या प्रकरणी पोलीसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आह़े
गेल्या काही दिवसांपासून शहरात गणेश उर्फ पंकज ठाकूर, सचिन धनगर दोघे राहणार दोंडाईचा तसेच संदीप क्षत्रीय व शिरीष क्षत्रीय राहणार सोमावल हे गरीब, आदिवासी लाभाथ्र्याना घराचे अमिष दाखवून त्यांना आवास योजनांचे अर्ज विकण्याचा गोरख धंदा चालवत होती़ ही बाब शहरातील शिवसेनेच्या पदाधिका:यांना लक्षात येताच त्यांनी याचा भांडाफोड केला़ या गैरप्रकाराला आळा घालावा यासाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना एक निवेदन देण्यात आले आह़े बुधवारी शहरात काही तरुण फसवणूक करुन असे अर्ज विक्री करीत असताना शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे, उपशहर प्रमुख प्रदीप शेंडे, आनंद सोनार, पुष्पेंद्र दुबे, किरण सूर्यवंशी आदी पदाधिका:यांनी त्यांना जाब विचारला़ मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या निदर्शनास शिवसेना पदाधिका:यांनी ही बाब आणून दिली़ बांधकाम विभागाचे अभियंता शंकर गावीत यांच्या फियार्दीवरुन चौघांविरुध्द तळोदा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े