जळगाव : दुकानावर कामासाठी जात असलेल्या सागर मोहन बेसार (२८ मुळ रा. वर्धमान मेमारी, सुलतानपूर, ता.जि. वर्धमान, पश्चिम बंगाल,ह.मु.जोशी पेठ, जळगाव) या बंगाली कारागिराला दोन जणांनी बेदम मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख ८०० रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सचिन प्रदीप भावसार (२५,रा. चौघुले प्लॉट) यास शहर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा तरुण बंगालमधील मुळ रहिवासी असून सहा महिन्यापासून जळगावातील जोशीपेठ येथे वास्तव्यास आहेत. कलाम शेख यांच्याकडे सोन्याच्या दागिण्यांना पॉलीश करण्याचे काम करतो. सोबत राहणाऱ्या अजीम कलाम शेख याने सागर बेसार यास मोबाईल वापरण्यास दिला आहे. १५ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सागर हा राजकमल सिनेमागृहाजवळून नाश्ता करुन पुन्हा दुकानावर जात असतानादोन अनोळखी तरुणांनी त्यास आवाज देवून बोलाविले. याकडे सागरने दुर्लक्ष केले, यानंतर संबंधित दोघेही सागरजवळ आले. त्यातील एकाने सागरच्या शर्टाची कॉलर पकडून दुसºयाने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सागरच्या खिशातील सहा हजार रुपयांचा मोबाईल तसेच रोख ८०० रुपये हिसकावून घेतले. तसेच या घटनेबाबत कुणाला काही सांगितले, तर तुला जीवंत ठेवणार नाही, शी धमकी दिली. व दुचाकीवरुन पोबारा केला.२४ तासात संशयिताला अटकया घटनेप्रकरणी सागर बेसार याच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. सागर याने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. यात सचिन भावसार याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील वासुदेव सोनवणे, सुनील पाटील, गणेश शिरसाळे, गणेश पाटील, नरेंद्र ठाकरे, अक्रम शेख, नवजीत चौधरी, विजय निकुंभ, रतन गीते, योगेश साबळे, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने सचिन भावसार यास शहरातून अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या तायडे या साथीदाराचे नाव सांगितले असून गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल तसेच ८०० रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
बंगाली कारागिराला मारहाण करुन लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:25 PM