जळगाव : निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टतर्फे स्थापना करण्यात आलेल्या श्री अय्यप्पा स्वामी पंचायत मंदिरामध्ये एकाच ठिकाणी सहा देवी-देवतांचे आणि त्यातही दाक्षिणात्य मूर्तींचे दर्शन गेल्या १८ वर्षांपासून शहरवासीयांना होत आहे. दाक्षिणात्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरामध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून ते शहरवासीयांचे श्रद्धास्थान बनले आहे.जळगाव शहरात जवळपास ३०० केरळी बांधवांचे कुटुंब असून विविध व्यवसायानिमित्त ते येथे स्थायिक झाले व शहरवासीयांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले. त्यामुळे महाराष्ट्रीय व त्यात जळगावकरांना दक्षिणेतील देवी-देवतांचे दर्शन व्हावे म्हणून येथे त्या शिल्पकलेचे मंदिर स्थापन करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार निवृत्त अभियंता हरिहर अय्यर यांनी मंदिराचा आराखडा तयार केला व २६ जानेवारी २००० रोजी केरळी महिला ट्रस्टतर्फे निवृत्तीनगर येथे श्री अयप्पा स्वामी पंचायत मंदिर आकाराला आले.सुरेशदादा जैन यांनी दिली जागामंदिर तर उभारायचे आहे, मात्र जागेचा प्रश्न होता. त्यामुळे केरळी बांधवांतर्फे हा प्रस्ताव माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडे ठेवण्यात आला व सुरेशदादांनी त्यास होकार देत नगरपालिकेच्यावतीने जागा उपलब्ध करून दिली.एकाच ठिकाणी विविध देव-देवतांचे दर्शननिवृत्तीनगरात स्थापन करण्यात आलेले हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून येथे एकाच ठिकाणी सहा विविध देव-देवतांचे दर्शन होते. यामध्ये श्री अयप्पा स्वामी मंदिर, श्री गणपती, श्री कार्तिक स्वामी, श्री महाविष्णू शिवशंकर, श्री देवी मदुराई मीनाक्षी मंदिर, श्री नवग्रह मंदिरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे मंदिर कौलारू तसेच दाक्षिणात्य पद्धतीच्या मूर्ती आहेत. या साठी खास महाबलीपूरम् येथून काळ््या पाषाणाच्या मूर्ती आणून त्यांची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या निमित्ताने शहरवासीयांना शहरातच दाक्षिणेतील देवी-देवतांचे दर्शन होते.जागृत देवस्थानया मंदिरामध्ये ११ वस्तंूचा अभिषेक केल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे येथे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढून ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. त्यामुळे भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात.वर्षभर विविध उत्सवया मंदिरामध्ये नवरात्र, एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्री, श्री स्वामींची मंडलपूजा असे विविध उत्सव वर्षभर होण्यासह कार्तिक पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी येथे भाविकांची रिघ लागलेली असते.केरळी महिला ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर यांच्या मार्गर्शनाखाली यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगावात दाक्षिणात्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना - श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:53 AM
दाक्षिणेतील देवी-देवतांचे दर्शन
ठळक मुद्देभाविकांचे श्रद्धास्थानवर्षभर विविध उत्सव