मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील इच्छापूर निमखेडी येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रम घेण्यात आला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. प्राकृतावर मात करून विकृत मूल्य जोपासल्यामुळे समाजातील मुलींचा जन्मदर कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील व वैशाली तायडे, पं.स.सदस्य विकास पाटील, राजू सावडे, विनोद पाटील, पुंडलिक पाटील, नीरज बोराखडे, चंद्रकांत भोलाणे, सुनीता पाटील, लीलाबाई पवार, अनिल वाडीले, भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, सुभाष पाटील, रसाळ चव्हाण, प्रभुदास जाधव, आसिफ खान, संजय पाटील, डॉ.विष्णू रोटे, रतिराम पाटील, नगराम चव्हाण, प्राचार्य एन.आय.पाटील हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य मुन्ना बोंडे, विनायक वाडेकर व ज्ञानपूर्ण विद्यालयातर्फे करण्यात आले. परिसरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सरपंच म्हणून इच्छापूरच्या कोकिळाबाई धात्रक व निमखेडीच्या सरपंच शशिकला कांडेलकर यांचाही गौरव करण्यात आला.बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.सूत्रसंचालन विनायक वाडेकर यांनी, तर आभार प्राचार्य एन.आय.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुन्ना बोंडे, सी.बी.मोरस्कर, भानुदास मुळक, प्रा.विद्या मंडपे, मीनल कोल्हे, जी.एम.पवार, भगवान महाजन, राहुल मुळे, संजय भडांगे, अंबादास लोने, उत्तम बेलदार, गोपाळ निंबोडे, आशिष धाडे, सुरेश वानखेडे, रमेश वानखेडे, बाबूराव बोंडे, गोपाळे येरुकार तसेच ज्ञानपूर्ण विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतरांनी प्रयत्न केले.
इच्छापूर येथे ‘बेटी बचाव- बेटी पढाव’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 7:01 PM
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील इच्छापूर निमखेडी येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रम घेण्यात आला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. प्राकृतावर मात करून विकृत मूल्य जोपासल्यामुळे समाजातील मुलींचा जन्मदर कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या पंचमहाभूतांनी जबाबदारीने खेडेगावात काम केले तर मुलींचा जन्मदर देशात बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास डॉ.राजेंद्र फडके यांनी व्यक्त केला.मुलींना जन्माला येऊ द्या व फुलपाखराप्रमाणे उडू द्या, असा संदेश देणाºया रांगोळी स्पर्धेचे कौतुक माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणातून केले.विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांसोबतच विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा कार्यक्रमप्रसंगी झाला गौरव