लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोमवारी जळगाव शहरात नवे ६१ कोरोना बाधित आढळून आले असून १२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत प्रथमच जळगाव शहरात शंभरापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे मात्र मृृतांची संख्या कमी होत नसून सोमवारी ६ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहरात सक्रिय रुग्णांची संख्या १५०० वर आली आहे. ग्रामीणमध्ये १६ बाधित आढळून आले असून ३० जण बरे देखील झाले आहेत. ग्रामीणमध्ये दाेन मृत्यू झाले आहेत. जळगाव शहरात रुग्णसंख्या कमी झाली असून अन्य तालुक्यात मात्र, रुग्ण वाढत असल्याचे चित्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून समोर येत आहे. जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या ही दीडशेपेक्षा कमी नोंदविली जात होते. ती सोमवारी शंभराच्या खाली आल्याने आलेख घसरत असल्याचे एक सकारात्मक चित्र समोर आले आहे. सोमवारी जिल्ह्यात १२ मृत्यू झाले असून नियमित संख्येपेक्षा ही संख्याही घटली आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील ३५, ५२, ५९, ८० वर्षीय पुरुष रुग्ण तर ७० व ८० वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. यासह जळगाव तालुका २, जामनेर, भुसावळ, धरणगाव, मुक्ताईनगर प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे.
चाचण्या घटल्या
रविवारी सुटी असल्याने कमी चाचण्या होत असतात, मात्र यंदा सोमवारीही अँटिजन चाचण्यांचे प्रमाण कमी होते. यात ३५८६ चाचण्या झाल्या असून यात ६५२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरचे २१२० अहवाल समोर आले. त्यात १९२ बाधित आढळून आले आहेत.
टाॅप पाच तालुके
चोपडा १५०
भुसावळ १३२
चाळीसगाव ९४
एरंडोल ७४
जळगाव शहर ६१