शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

खबरदार... चुकीचे काम कराल तर होणार फोन टॅप!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 10:05 AM

देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.

- सुनील पाटील

जळगाव : चुकीचे काम करणार्यांचे फोन टॅप होण्याची शक्यता अधीक असते. मात्र राजकीय हेतूसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे व शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. खडसे यांचा ६७ वेळा तर राऊत यांचा ६० वेळा फोन टॅप झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. फोन टॅपिंग म्हणजे नेमके काय?, ते केव्हा आणि कसे केले जाते, त्याला कोणाची परवानगी लागते याविषयी ‘लोकमत’चा हा स्पेशल रिपोर्ट वाचकांसाठी देत आहोत.

देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्हा पातळीवर फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे जातो, तेथून तो राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांकडे जातो, त्यानंतर गृह विभागाचे अपर मुख्य सचिव त्यास परवानगी देतात. त्याशिवाय मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागांना फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांनाही गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांचीच परवानगी घ्यावी लागते. गंभीर प्रकरणांशिवाय फोन टॅप करताच येत नाही.

या कायद्यान्वये करता येतो फोन टॅपदेशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्र राष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे.

कशामुळे चर्चेत आले प्रकरणरश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागात आयुक्त असताना राज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त असताना बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूदसुरक्षा यंत्रणा, सैन्यदल किंवा सरकारी आस्थापनांमध्ये हेरगिरी केल्यास आणि गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यास १४ वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्याशिवाय भारतीय तार अधिनियम कलम २६ अ नुसार इतर खटल्यांमध्ये ही शिक्षा तीन वर्षं कारावास व दंडाची तरतूद आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ...जिल्हा पातळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या इंटरसेप्शन विभागातून हे कार्य करता येते, मात्र त्यासाठी तसे संवेदनशील प्रकरण असले पाहिजे. देशविरोधी कार्य, दहशतवाद किंवा अन्य गंभीर प्रकरण असेल तरच फोन टॅपिंग होते. त्यासाठी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.- किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

विनापरवानगी फोन टॅपिंग केले तर भारतीय तार अधिनियम कलम २६ अ नुसार अशा व्यक्तीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा आहे. त्यात दंडाचीही तरतूद आहे. सुरक्षा यंत्रणेत हेरगिरी तसेच गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यास १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.- केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Jalgaonजळगाव