जळगाव : आठवडाभरापासून सुरु असलेल्या चर्चेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे बी.जी.रोहोम यांची वर्णी लागली आहे. तर त्यांच्या जागी पाचोरा येथे कार्यरत असलेले सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांची नियुक्ती झाली आहे. या दोन्ही बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मंगळवारी सकाळी काढले.स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात २८ आॅक्टोबर रोजी बदली झाली होती. गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षकांनी त्यांना कार्यमुक्त करुन तात्पुरता पदभार सहायक निरीक्षक महेश जानकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या खुर्चीवर कोण विराजमान होणार यासाठी गेल्या आठवड्यापासून विविध नावांची चर्चा होती.आणखी चार कर्मचारी प्रशिक्षणालापोलीस ठाण्यात तसेच स्थानिक गुन्हे शाखेत विशेष दबदबा असलेल्या ७६ पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात एक महिन्याच्या ‘विशेष नवचैतन्य कोर्स’या प्रशिक्षणासाठी मुख्यालयात जमा केल्यानंतर सोमवारही पुन्हा चार कर्मचाºयांना याच प्रशिक्षणासाठी मुख्यालयात जमा केले. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन, पाचोरा येथील एक व एमआयडीसीच्या एका कर्मचाºयाचा समावेश आहे. दरम्यान, भविष्यात आणखी मोठे बदल करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
जळगावात ‘एलसीबी’ची धुरा बी.जी.रोहोम यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:07 PM