भडगाव, जि.जळगाव : भडगाव तालुक्यातील वाडे येथील शांताराम काशिराम सोनवणे या शेतकºयाच्या खिल्लारी बैलजोडीचा अचानक आजारी पडल्याने मृत्यू झाला. दुष्काळी स्थितीत दीड लाखाचे पशुधनाचे नुकसान झाले आहे. मकरसंक्रांतीत सणासदीला या शेतकºयावर मोठे संकट ओढविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाडे परिसरात लाळखुरगटीसह साथीच्या आजारांनी मान उंचावली असून, जनावरे दगावत आहेत. याकडेकृृषी विभागाचे दुर्लक्ष झाले असून शेतकºयांसह पशुमालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.शांताराम सोनवणे या शेतकºयाची अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. परिस्थिती साधारण आहे. त्यांनी शेतात काबाडकष्ट , मोलमजुरी करुन एक वर्षापूर्वी वरखेडीच्या बाजारातून सव्वा लाख रुपयाला ही खिल्लारी बैलजोडी घेतली होती. या बैलजोडीला परिवाराप्रमाणे जीव लावून सांभाळ केला. या बैलजोडीवर त्यांनी शेतीची मशागतीची घरची कामे करुन इतर शेतकºयांकडेही मोलमजुरीचे कामे सुरुच ठेवली होती. त्यामुळे या बैलजोडीवर त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा. मोठी साथ त्यांना मिळायची. मात्र ही बैलजोडी अचानक आजाराने दगावल्याने या परिवाराचे उदरनिवार्हाचे साधन हिरावले आहे. मकर संक्रांतीच्या सणादिवशी या बैलजोडीची घटना घडली. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या गोड सणालाही या शेतकºयाच्या परिवारात संकटामुळे दु:खाचे वातावरण आहे.वाडे परिसरात जनावरांवर लाळखुरगटी आदी रोगांची साथतालुक्यातील वाडे परिसरात गायी, म्हशी, बैल, शेळ्या, घोडे यासह जनावरांची मोठी संख्या आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी जनावरांचे पालन पोषण करतात. दूग्ध व्यवसाय जोमात असल्याने पशुमालक जनावरांची अधिक काळजी घेतात. मात्र सध्या जनावरांवर लाळ खुुरगटीसह इतर आजारांची साथ असल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. शांताराम सोनवणे यांची बैलजोडीही लाळ खुरगटी आजाराची बळी ठरली आहे. शांताराम सोनवणे यांनी बैलजोडीवर खाजगी डॉक्टरांकडून औषधोपचार केला. मात्र प्रयत्न करुनही त्यांना बैलजोडी गमावण्याची वेळ आली आहे.
भडगाव तालुक्यातील वाडे येथे बैलजोडीचा आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 5:28 PM
भडगाव तालुक्यातील वाडे येथील शांताराम काशिराम सोनवणे या शेतकºयाच्या खिल्लारी बैलजोडीचा अचानक आजारी पडल्याने मृत्यू झाला. दुष्काळी स्थितीत दीड लाखाचे पशुधनाचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देगरीब शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसानमकरसंक्रांतीत सणासुदीला शेतकºयावर ओढवले मोठे संकटवाडे परिसरात लाळखुरगटीसह साथीच्या आजारांचे थैमान