भडगाव, जि.जळगाव : तालुक्यात यावर्षी कमी तापमान थंडीचे वाढते प्रमाण यामुळे केळी पिकावर करपा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत आहे. केळीच्या हिरव्यागार बागेला हळदीचा रंग आला आहे. त्यामुळे उत्पन्नातही बेरंग होणार आहे.तालुक्यात केळी पिकावर करपा रोगाने मोठे नुकसान होत असून, नुकसानीची शेतकºयांवर नुकसानीची टांगती तलवार आहे. शेतकºयांची झोप उडाली आहे. कृषी प्रशासनामार्फत तालुक्यात तत्काळ केळी पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील संकटग्रस्त केळी उत्पादक शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.भडगाव तालुक्यात केळी पिकावर करपा, चरका रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यात गिरणा काठावर वर्षानुवर्षापासून केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी सध्या १० अंश म्हणजे खूपच कमी तापमान झाल्याने केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा उत्पन्नाला मोठा फटका बसणार असून, केळी उत्पादक संकटात सापडल्याचे चित्र आहे. मागील वर्षी तालुक्यात केळी पिकाची ५०० हेक्टर क्षेत्रात लागवड केली होती. मात्र यावर्षी तालुक्यात दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई, केळीला भाव नाही त्यामुळे यावर्षी तालुक्यात केळी लागवडीत मागील स्थिती पाहता निम्म्याने घट झाली आहे.तालुक्यातील वाडे, बांबरुड प्र.ब., नावरे, गोंडगाव, सावदे, कोळगाव, गुढे, पांढरद, पिचर्डे, वडजी, बोदर्डे ,बोरनार, भडगाव, खेडगाव, निंभोरा, कोठली, कनाशी,गिरड यासह काही भागात गिरणा परिसरात केळी वर करपा (चरका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे केळी बागायतदार शेतकरी चिंतातूर झालेला आहे.केळी पीक विम्याचा शेतकºयांना लाभ मिळणारतालुक्यात ज्या शेतकºयांनी केळी पिकाची हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून विमा काढला आहे. अशा शेतकºयांना विम्याचा लाभ मिळणार आहे.त्यांना केळीचे स्वतंत्र पंचनामे करण्याची गरज नाही, अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.आमदार किशोर पाटील यांनी कृषी अधिकाºयांंना केळी पंचनाम्यासाठी केल्या सूचना — भडगाव येथे आमदार किशोर पाटील यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांसंदर्भात संबंधित अधिकाºयांची बैठक दि. ११ रोजी घेतली. या बैठकीत बोरनारचे सरपंच पी.डी.माळी यांच्यासह शेतकºयांनी केळी पिकावर करपा रोग पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तत्काळ केळी पीक नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी केली. त्यावर आमदार पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोरडे यांना याबाबत वरिष्ठ अधिकाºयांंशी चर्चा करुन केळी पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना आमदारांनी केल्या.
भडगाव तालुक्यात केळीवर करपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 7:17 PM
भडगाव तालुक्यात यावर्षी कमी तापमान थंडीचे वाढते प्रमाण यामुळे केळी पिकावर करपा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत आहे. केळीच्या हिरव्यागार बागेला हळदीचा रंग आला आहे. त्यामुळे उत्पन्नातही बेरंग होणार आहे.
ठळक मुद्देकेळीच्या हिरव्यागार बागेला हळदीचा आला रंगउत्पनातही होणार बेरंगनुकसानीची शेतकऱ्यावर टांगती तलवारपंचनामे करण्याची शेतकºयांची मागणी