आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ११ - ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन १५ दिवस झाले असले तरी जळगाव तालुक्यातील भादली खुर्द व सुजदे या ग्रामपंचायतीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत असून अर्ज दाखल करण्याच्या तारखेपासून ही साईट सुरूच न झाल्याने सहा दिवसात एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही. निवडणूक आयोगाच्या या अजब कारभारामुळे इच्छुकांचा मात्र हिरमोड होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाºया तसेच रिक्त असलेल्या सदस्यपदासाठी ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजीच जाहीर झाला आहे. यामध्ये ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून इच्छुकांची लगबग सुरू आहे.भादली, सुजदेच्या इच्छुकांच्या फेºयाअर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक गावातील इच्छुक इंटरनेट कॅफे, ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरत आहे. मात्र यात जळगाव तालुक्यातील भादली खुर्द व सुजदे या गावांचा अपवाद दिसून येत आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून या दोन्ही गावांचे अर्ज दाखल करण्यासाठी साईट सुरू केली असता त्या ठिकाणी या दोन्ही गावांचे अर्ज स्वीकारलेच जात नसल्याचे चित्र आहे. ५ फेब्रुवारीपासून या दोन्ही गावातील इच्छुक दररोज फेºया मारत असले तरी काहीही उपयोग होत नसल्याचे सांगण्यात आले. अर्ज दाखल प्रक्रियेस सहा दिवस झाले असले तरी या अडचणीमुळे एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही.अडीच दिवसांनंतरही सुरू झाली वेबसाईट५ रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५ व ६ रोजी आॅनलाईन साईटला सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर ७ रोजी दुपारी ३ वाजता ही साईट सुरू झाली. पुन्हा ८ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत साईट पुन्हा बंद होती. सर्व्हरच्या या खोड्यामुळे पहिले अडीच दिवस तर कोणत्याच ठिकाणचे अर्ज दाखल होऊ शकले नाही.सर्व्हर डाऊनमुळे रोज रात्रीचे बारादररोज सर्व्हरच्या समस्येमुळे अर्ज भरण्यास अडचण येऊन इच्छुकांचा हिरमोड होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी ई सेवा केंद्र अथवा संगणक चालकांना दररोज रात्री बारा वाजत असल्याचे संगणक चालकांनी सांगितले.ग्रामपंचायतसाठी १२६ अर्ज दाखलजळगाव : जळगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व सहा ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण १२६ अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठी १०१ अर्ज दाखल झाले आहे. अर्ज दाखल करण्यास मुदत वाढ देण्यात आल्याने सोमवार, १२ रोजी गर्दी होण्याची शक्यता आहे.जळगाव तालुक्यातील सुजदे, भादली खुर्द येथील अर्ज दाखल करण्यास आॅनलाईनवर अडचणी येत आहे. या बाबत निवडणूक आयोगास कळविले असून त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविले आहे.- अमोल निकम, तहसीलदार
भादली खुर्द, सुजदे ग्रामपंचायत निवडणूक आॅनलाईनवर बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:32 PM
अजब कारभार
ठळक मुद्देअर्ज प्रक्रियेस सहा दिवस होऊन एकही अर्ज दाखल होऊ शकला नाहीग्रामपंचायतसाठी १२६ अर्ज दाखल