जळगाव : भादली हत्याकांडातील मारेक:यांर्पयत पोलिसांना अद्यापर्पयतही पोहचता आलेले नाही. चौकशीसत्राबरोबरच पोलिसांनी आता काही जणांचे लेखी जबाब घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सोमवारी आठ जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जात आहे.तपासाची व्याप्ती वाढवून पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी रविवारपासून फैजपूरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, मुक्ताईनगरचे उपअधीक्षक समीर शेख या तीन पोलीस उपअधीक्षकांना तपास कार्यात सहभागी करून घेतले आहे. सोमवारी आठ जणांचे जबाब घेतल्यानंतर गावातील काही जणांची चौकशी करण्यात आली. विविध संस्थांचे पदाधिकारी व राजकीय व्यक्तींचीही तपास कामात मदत घेतली जात आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस घेतील अशी हमी देत माहितगाराचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचेही पोलिसांनी जाहीर केले आहे.संशयित लोकांचे मोबाईल क्रमांक घेण्यात येत असून मयताचा त्यांच्याशी संपर्क आला आहे का? या दृष्टीनेही सायबर सेल रात्रंदिवस याच कामात लागला आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर दररोज नशिराबादला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
भादली हत्याकांड; आठ जणांचे घेतले लेखी जबाब
By admin | Published: March 28, 2017 12:15 AM