जळगाव : भादली खु.।। येथील समाधान भागवत पाटील (३५) या तरुण शेतकºयाने राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली.समाधान पाटील यांचा शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. शेतीसाठी त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज काढले होते. कर्ज कसे फिटणार या विवंचनेत ते होते. त्यात रविवारी दुपारी घरी कोणीही नसताना समाधान पाटील विषप्राशन केले. माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या ठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाली होती.समाधान पाटील यांच्या पत्नी व आईचे या पूर्वीच निधन झाले आहे. त्यांची एक मुलगी व मुलगा हेआईचे निधन झाल्यापासून मामाकडेच राहतात. भादली येथे घरी केवळ समाधान व त्यांचे वडील भागवत पाटील हे दोघेच राहत होते. रविवारी भागवत पाटील हे नातवांना पैसै देण्यासाठी गेलेले होते व इकडे समाधान पाटील यांनी जीवनयात्रा संपविली.
भादलीच्या कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:26 PM