भगवान विष्णूंची हजारे नावे आहेत. त्यात सर्वात सोपे व श्रेष्ठ रामनाम आहे. रामरक्षामध्ये शेवटचा श्लोक सांगतो की विष्णूंची सहस्र नामे एका बाजूस व रामनाम एका बाजूस आहे. किंमत सारखीच! ज्याप्रमाणे एक रुपयाच्या हजार नोटा व एक हजाराची एकच नोट किंमत समान होते तसे ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे.. सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानने’ भगवान श्रीकृष्ण स्वत: भगवद्गीतेत म्हणतात हा संसार दु:खालय आहेत. अशाश्वत व अस्थिर आहे म्हणून या दु:खालय संसारात सुख कसे मिळेल संतांच्या भाषेत बोलायचे झाले तर असे ‘संसार दु:खमूळ चहूकडे इंगळे। विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळा।’ हा संसार दु:खाला कारणीभूत आहे. संसारात सुख शोधत आहात तर या दु:खरूपी संसारात सुख कसे मिळणार. आता दु:खाचे काही प्रकार आहेत ‘कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडेथोडे सबदुखी, सुखी शाम के दास’ या जगात फक्त ज्याने भगवंताचे नामजप आपल्या मुखात घेतले आहेत तोच नशीबान जगात आहे. दु:खरुपी संसारात सुखी आहे. एक संत संसारात सुख कसे मिळेल ते आपल्या मस्तीत सांगायचेआराम की तलब है तो बस एक काम कर, आ राम की शरण में और राम राम करयही आराम पानेका एक उपाय आहे. या दु:खरुपी संसारात सुख प्राप्त करण्याचा एकच उपाय आहे. रामनाम हेच खरे मनुष्य जीवनाचे सार. हे भगवान श्रीरामाला प्राप्त करणे हीच जीवनाची सार्थकता आहे. यामध्ये मनुष्याचे कल्याण आहे राम हेच मनुष्य जीवनाचे परम लक्ष आहे. कारण राम नावामध्ये खूप ताकद आहे. आपण जर राम नाम घेतले तर राम स्वत: पद देऊन आपल्यासारखे करतो.‘राम म्हणता रामची होईजे। पदी बसून पदवी घेईजे। म्हणून मनुष्य जीवनाचे सार राम आहे. यात सुख व कल्याण आहे. आपला तो एक देव करुनी घ्यावा तेणे विण जिवा सुख नव्हे आपल्या जीवनात सुख प्राप्त करावा असे वाटत असेल किंवा शेवट गोड व्हावा, असं वाटत असेल तर राम राम म्हणा.-सुनील महाराज शास्त्री,नशिराबाद
भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:18 PM