भुसावळ, जि.जळगाव : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी लोक संघर्ष मोर्चातर्फे बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भजन सत्याग्रह करण्यात आला.१२ मार्च २०१८ रोजी नाशिकपासून मुंबईपर्यंत पायी गेलेल्या मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यात सर्व वनदाव्याचा सकारात्मक निपटारा करण्याची लेखी आश्वासने दिली होती. आज या गोष्टीला बरोबर सहा महिने पूर्ण झाले. प्रत्यक्षात मात्र वनदाव्यांची अंमलबजावणी कायद्याचा मूळ हेतू (आदिवासींवर ऐतिहासिक अन्याय झाला असून तो दूर करण्यासाठी आम्ही हा कायदा आणत आहोत) हे लोकसभा, राज्यसभेतील सर्व खासदारांनी एकदिलाने एकमताने मंजूर केलेले असतानासुद्धा भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात दाव्यांची संख्या निश्चित नाही. १२ अ पडताळणीची संयुक्त प्रक्रिया कोणत्याच तालुक्यात पार पडल्याने व्याधीत झालेल्या लोकसंख्या मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यात दावे पूर्ण करण्याच्या मुदत संपलेल्या दिवशी व गणरायांचे आगमन झाल्याच्या आदल्या दिवशी ज्ञानोबा-तुकाराम मुक्ताई जनाई वनपट्टे आम्हाला देगा आई गणराया या प्रांताला तू बुद्धि दे असे म्हणत भजन सत्याग्रह केला.या वेळी प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात बैठकीला येण्याची विनंती केल्यावर लोकसंघर्ष मोर्चाने त्यांच्याबरोबर सुमारे साडेतीन तास बैठक केली. यात प्रांताधिकाºयांनी १४ रोजी मुक्ताईनगर येथे वनअधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अध्यक्ष, सचिव तथा लोकसंघर्ष मोर्चाच्या चंद्रकांत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दाव्याची तफावत मिटवत १२ अ प्रक्रियेचा कार्यक्रम लावावा व १८ रोजी त्यांची अंमलबजावणी करावी हे ठरले. त्याचबरोबर दीपनगर व हायवेमध्ये बाधित गावांना न्याय मिळावा, दीनदयाळ नगरमध्ये हायवेच्या चौपदरीकरणात येणाºया घरांच्या पुनर्वसनासाठी कस्तुरबा गांधी नगरच्या कामाला गती द्यावी या मागण्यांवर चर्चा झाली. त्यात प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी, केशव वाघ, हिलाल ठाकूर, माणिक पाटील, रशीद तडवी, निर्मला ठाकूर, विमल पाटील, वामन भिल, बाळू इंगळे, अशोक तायडे, सतीश पाटील, भूमीबाई पावरा, कल्पना बेलदार इत्यादींनी सहभाग घेतला.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे भजन सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 8:08 PM
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
ठळक मुद्देसहा महिन्यांनंतरही आश्वासनाची अंमलबजावणी नाहीप्रांताधिकाºयांंनी कार्यकर्त्यांशी केली साडेतीन तास चर्चादाव्यातील तफावत दूर करण्याची मागणी