शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

शेतीत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 3:14 PM

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत प्रगती केल्याचे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देबारावीनंतर वळलो शेतीकडेउद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले शेतकरी चंद्रशेखर बढे यांची मुलाखत

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत प्रगती केल्याचे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.येत्या १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘उद्यान पंडित’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : शेती या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळले? आणि यामध्ये तुम्हाला आवड कशी निर्माण झाली?उत्तर : वयाच्या विसाव्या वषार्पासून मी शेती करायला सुरुवात केली आमच्याकडे 17 एकर पारंपारिक शेती होती व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास मी सुरुवातीपासूनच प्रवृत्त झालो.नवनिर्मितीची कल्पना व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या बळावर शेतीत फार मोठी भरारी घेता येऊ शकते हा मला विश्वास होता म्हणुन बारावीचे शिक्षण झाल्यानंतर आणि शेती व्यवसायाकडे वळले.प्रश्न : आधुनिक तंत्रज्ञान व शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी तुम्ही स्वत: कोणते प्रयत्न केले?उत्तर : मूळातच शेती हा माझा आवडता विषय असल्याने मी अनेक कृषी मेळावे कृषी चर्चासत्र परिसंवाद ह्यात मी स्वत: सम्मिलित होऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं व बाजारपेठेची गरज लक्षात घेता पीक पद्धतीमध्ये कशा प्रकारचे बदल केले जावे याचे मी तंत्रज्ञान यातून शिकलो. भारतातील विविध कृषी विद्यापीठे व संस्था तसेच संशोधन केंद्रांना देखील मी स्वत: भेटी देऊन विविध प्रयोगातून यशाचे शिखर काबीज केले आहे.प्रश्न : हळद आणि आले या पिकांकडे तुम्ही कशा प्रकारे ओढले गेले?उत्तर : हळद आणि आले हे चांगला पैसा देणारे पीक आहे त्या काळात जळगाव जिल्ह्यात कोणीही आनंदाची किंवा आल्याची लागवड विशेषत: करत नसेल मी स्वत: नांदेड भागात जाऊन हळदीची माहिती घेतली व सर्वात प्रथम हळदीचे बेणे मुक्ताईनगरला रुईखेडा क्षेत्रामध्ये आणून लागवड केली त्यासाठी सेलम ही जात निवडली चांगले उत्पादन घेतले परंतु ओली हळद विकल्या गेल्याने त्यावर घरीच प्रक्रिया करून मला ती विकावी लागली. त्यातून चांगला नफा मिळाला व शेतकº्यांसमोर पारंपरिक पिकांपेक्षा एक वेगळा पर्याय उभा केला. त्यासाठी गांडूळ खत, शेणखत, लेंडीखत व जैविक तंत्रज्ञान या वापरासोबतच हा भाग दुष्काळी असल्याने व हळदीसाठी कमी पाणी लागत असल्याने खर्चदेखील माझा निम्म्यावर आलेला होता व हीच बाब आल्यासाठी सुद्धा लागू पडली. हळद आणि आल्या सोबतच बाजारपेठेची गरज लक्षात घेत सिताफळ व शिमला मिरचीची शेती करून तीदेखील आपण यशस्वी केली आहे.प्रश्न : पॉलिहाऊस या संकल्पनेबद्दल काय सांगाल?उत्तर : खऱ्या अथार्ने पॉलीहाऊस ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रातील आहे २०१४ मध्ये मी पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागात जाऊन माहिती घेऊन माझ्या शेतीमध्ये पॉलिहाऊस उभारले व त्यामध्ये शिमला मिरची गुन्हा टमाटे काकडी यासारखी भरघोस पिके घेऊन उत्पन्न मिळवले मुक्ताईनगरमध्ये हे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवण्यासाठी सालबर्डी, कोथळी, मुक्ताईनगर अंतुलीं या भागात पॉलिहाऊसची उभारणी करण्यात मी स्वत: शेतकºयांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये अत्यंत उष्ण वातावरण व पाण्याची कमतरता अशा अनेक संकटांवर मात करून पॉलिहाऊस हे यशस्वी उत्पादन देते हे माझ्या प्रयोगाने सिद्ध केले आहे.प्रश्न : गुलाबाची शेती हा देखील एक नवीनच प्रयोग याची सुरुवात कशी झाली?उत्तर : २०१४-१५ ला मी शेतीविषयक मासिक वाचत असताना गुलाब शेती हा विषय माझ्या मनात आला. त्याच वर्षी मी शेतात पॉली हाउसची निवड करत त्यात गुलाबाची शेती करायला सुरुवात झाली. केवळ पाच महिन्यांनंतरच मला गुलाबाच्या शेतीतून उत्पादन मिळायला सुरुवात झाली. ही फुले मी नागपूर इंदूर, मध्य प्रदेश येथील मार्केटला पाठवले. गुलाब पिकांमधून मला साधारणपणे वर्षाकाठी चार लाख फुले मिळतात आणि प्रति फूल तीन ते चार रुपये प्रति फूल याप्रमाणे वर्षाकाठी मला गुलाबापासून जवळपास बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळते. थोडीशी काळजी घेणे या शेतीसाठी महत्त्वपूर्ण आहे मात्र त्यातून उत्पादन नक्कीच मोठ्या प्रमाणावर मिळते.प्रश्न : उद्यान पंडित पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्ही शेतकºयांना काय संदेश द्याल?उत्तर : शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय असून शेतीतूनच आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन संकल्पना राबवून आपण स्वत:चा विकास करू शकतो. कमी पाणी आणि जास्त उत्पादन हे तंत्रज्ञान प्रत्येकाने वापरले पाहिजे माज्या अनुभवाचा फायदा मी परिसरातील शेतकºयांना करून दिला आहे. मिरची आणि गुलाब उत्पादनासाठी शेतकºयांचा स्वत:च एक ग्रुप तयार करून माहितीची देवाणघेवाण आम्ही करत असतो. अर्धा एकर मध्ये कृषी विभागाच्या साह्याने शेततळे मी बांधून घेतली. त्याची क्षमता सात लाख लीटर पाण्याची आहे. त्यामध्ये पाणी माझ्या शेतीसाठी दोन ते तीन महिने पुरवले जाते. अशाप्रकारे आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारून शेतकºयांनी शेतीसोबतच स्वत:लाही समृद्ध करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :interviewमुलाखतMuktainagarमुक्ताईनगर