जळगाव- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी १० रोजी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदलाजळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट, दाणा बाजार, गोलाणी मार्केट आदी भागात बहुतांश दुकाने बंद होती. तर इतर शहराच्या भागात व्यवहार सुरळीत दिसून आले.काँग्रेस भवन आवारात जमले पदाधिकारी व कार्यकर्तेबाजारपेठेत फेरफटका मारत भारत बंदचे आवाहन करण्यासाठी कॉंग्रेस भवन आवारात कॉंग्रेस आणि बंदला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिमार्णन सेना, समाजवादी पार्टी आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी साडेनऊ वाजेपासूनच जमायला सुरुवात झाली.काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले उशिराकाँग्रेस भवन आवारात राष्ट्रवादी काँग्रेसेचे व इतर कार्यकर्ते आधी आले. कॉॅग्रेसचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र त्यांच्यापेक्षा उशिरा आले. विशेष म्हणजे काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांची जिल्हा पातळीवर अनुपस्थिती होती.काही ठिकाणी केली दमबाजीहीफुलेमार्केट, गोलाणी मार्केट, दाणाबाजार या ठिकाणी आधीच बहुतेक दुकाने बंदच होती. मात्र जी मोजकी दुकाने या ठिकाणी उघडी दिसली. त्यांना काहींना शांततेत बंदचे आवाहन केले तर काही ठिकाणी तोडफोड होईल, असा दम भरुन दुकाने बंद करण्यात आली.पदाधिकाऱ्यांनी केले आवाहनबंदसाठी फिरताना काँग्रसेचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले.मोदी सरकार विरुद्ध घोषणाबजीयाठिकाणी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे, या सरकरचे करायचे काय खाली डोके वर पाय, गली गली मे शोर है.. मोदी सरकार चोर है.. आदी घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
Bharat Bandh : जळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 3:33 PM
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी १० रोजी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्देजळगावातील मुख्य बाजरपेठ पूर्णत: बंदउपनगरासह अन्य ठिकाणी व्यवहार सुरळीतमोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी