भारत बंदला माथाडी कामगार संघटनेचा पाठिंबा
जळगाव : शेतकरी संघटनांतर्फे मंगळवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेतर्फेही पाठिंबा दर्शवून, विविध मागण्यांचे उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉमेश सपकाळे, शरद चौधरी, नंदु पाटील, तुकाराम गर्जै, यश सपकाळे उपस्थित होते.
शेगावसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या तीर्थ क्षेत्रावर जळगाव आगारातर्फे दररोज सकाळी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतर्फे करण्यात यावी, ही सेवा सुरू झाल्यावर महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
फुले मार्केट जवळ वाहनतळ उभारण्याची मागणी
जळगाव : फुले मार्केट येथे खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच गाडी उभी करत असल्यामुळे, वाहतुकीला अडथळा येत आहे. यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपाने फुले मार्केट जवळ मनपाच्या जागेवर मोफत वाहनतळ उभारण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.
सुपरफास्ट गाड्यांमध्ये मासिक पास लागू करण्याची मागणी
जळगाव : सध्या रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी, या गाड्यांमध्ये मासिक पास धारकांना प्रवासाला मनाई आहे. यामुळे चाकर मान्यांची गैरसोय होत असून, त्यांना खाजगी बसने जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट गाड्यांमध्ये मासिक पास लागू करण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे.
मेमू ट्रेनची प्रवाशांना प्रतिक्षा
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाततर्फे दिवाळीनंतर भुसावळ ते नाशिक दरम्यान मेमू ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, डिसेंबर महिना सुरू आठवडा उलटुनही ही गाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही गाडी कधी सुरू होणार, याची प्रवाशांना प्रतिक्षा लागून आहे.