जळगाव- महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे यांची सोमवारी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी बिनविरोध निवड घोषित केली आहे.भाजपच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कार्यकाळ सीमा भोळे यांचा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला होता़ त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या भारती सोनवणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, त्यांना सर्वपक्षीय पाठींबा मिळाला आणि त्यातच त्यांच्याविरूध्द अर्ज नसल्यामुळे सोमवारी पिठासीन अधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली़ याप्रसंगी भाजपचे सर्वपदाधिकारी उपस्थित होते़ तर महापौरपदी निवड झाल्याबद्दल भारती सोनवणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती़ त्याचबरोबर मनपाच्या इमारती बाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. दरम्यान, महानगरपालिकेच्या त्या १५ महापौर म्हणून निवड झाली आहे.
भारती सोनवणेंची महापौरपदी बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:31 PM