ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23 - केंद्र सरकारने नियुक्त केलेला नीती आयोग देशासाठी अनियती आयोग ठरत आहे. या आयोगाचे पुनर्गठन केले जावे अशी मागणी करत भारतीय मजदूर संघाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
भारतीय मजदूर संघातर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्राच्या नीती आयोगा विरोधात कर्मचारी विविध घोषणा देत होते.
1950 मध्ये अस्तित्वात आलेला योजना आयोग मोदी सरकारने गुंडाळून त्याऐवजी नीती आयोगाची स्थापना केली. परंतु हाच नीती आयोग देशासाठी अनिती आयोग ठरत असल्याचे भारतीय मजदूर संघाचे म्हणणे आहे. या आयोगाचे पुनर्गठन केले जावे अशी मागणी यावेळी प्रभाकर बाणासुरे यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष पी.जे. पाटील, जिल्हा सचिव किरण पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.