जळगाव : श्रीनिवास कॉलनीतील सुनिता सुरेश पाटील (वय ६०) या वृध्देच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व सोनसाखळी तोडून पलायन केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शुक्रवारही सिध्देश्वर नगरात घराबाहेर उभ्या असलेल्या सुनीती सुधाकर कुळकर्णी (वय ७६) या वृद्धेच्या गळ्यातील ३ तोळ्याची ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या दोन्ही घटनत पत्ता विचारण्याचा बहाणा करण्यात आला.
सुनीती कुळकर्णी या शुक्रवारी दुपारी चार वाजता घराबाहेर असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. सुनीती कुळकर्णी यांचे लक्ष विचतील होताच यातील एका चोरट्याने दोन्ही हातांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली. सेकंदातच दोन्ही चोरट्या भरधाव वेगाने निघुन गेले. यातील एका चोरट्याने चौकट असलेले शर्ट घातले होते, ऐवढेच त्या सांगु शकल्या. यावेळी त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या होत्या.या प्रकरणी सुनीती कुळकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी तपास करीत आहेत.