आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१: मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या राबीयाबी तुराब खान (रा.रामनगर,शिरसोली नाका, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. ही घरफोडी भरदिवसा झाल्याचा संशय आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिरसोली नाक्यावरील रामनगरात राबीयाबी खान या एकट्या राहतात. त्या महापालिकेच्या सिंधी कॉलनीतील दवाखान्यात परिचारिका होत्या. ५ फेब्रुवारी रोजी त्या घराला कुलूप लावून हज यात्रेला गेल्या होत्या. या काळात त्यांच्या घरी तांबापुरात राहणाºया भावाची मुलगी समरीन खान मुसरबी व भावाची सून नौशाद बी व लहान मुलगा महम्मद अली असे तिघं जण राहत होते. बुधवारी पहाटे नळांना पाणी येणार असल्याने तिघं जण मंगळवारी घराला कुलूप लावून तांबापुरात गेले होते. रात्रभर ते तिथेच थांबले. बुधवारी दुपारी चार वाजता घरी आले असता घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता तर कुलूपही गायब झालेले होते.सोने ठेवण्याच्या रिकाम्या डब्या पलंगावरघरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. तीन कपाट उघडे होते.त्यातील तिजोºयाही तोडण्यात आल्या होत्या. कपाटात ठेवलेले दागिने गायब झालेले होते. तर दागिन्यांच्या डब्या रिकाम्या पलंगावर आढळून आल्या. सर्वच खोल्यांमध्ये चोरट्यांनी शोधाशोध केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घरात राबीयाबी एकट्याच राहतात. त्या अपंग आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत त्या जळगावात पोहचणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्या आल्यावरच मुद्देमालाबाबत स्पष्ट होईल.
हज यात्रेसाठी गेलेल्या जळगावच्या निवृत्त परिचारिकेकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 9:56 PM
मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या राबीयाबी तुराब खान (रा.रामनगर,शिरसोली नाका, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. ही घरफोडी भरदिवसा झाल्याचा संशय आहे.
ठळक मुद्देराम नगरातील घटनालाखो रुपयांचे दागिने लांबविलेकडीकोयंडा व कुलूप तोडले