शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

भिडे बाग : आठवणीचा अमूर्त अल्बम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 1:13 AM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत धुळ्यातील ३५ वर्षांपूर्वीच्या भिडे बागेच्या आठवणींविषयी लिहिताहेत शेखर देशमुख...

तारुण्यात जगलेले सोनेरी क्षण नव्याने वेचण्याच्या ओढीने भिडे बागेत एकत्र जमलेल्या समस्त मित्रांना सप्रेम नमस्कार.समस्तास असं जेव्हा मी संबोधतो, तेव्हा माझ्या नजरेपुढे भाऊ (पावसकर), धनू (शुक्ल), जग्या (जतीन पांचाल), राहुल-अतुल-मिलिंद (कुलकर्णी), बापू (देशमुख), छोटू (पाटील) गोडबोले बंधू, केदार (जोशी) पिंट्या (खैरनार), राजेश- महेश (घुगरी बंधू) अण्णा (पावसकर), मुन्ना (पावसकर), महेश (करमरकर) हे सारे येतातच. पण याचसोबत पप्या (पावसकर), राजू (भिडे) रामकाका (शुक्ल) यांनाही मी या समस्तांमध्ये गृहित धरतो. नव्हे मला हे सगळेजण आजही एका फ्रेममध्ये एकत्रच दिसतात़ लोकार्थाने खरं तर ते तिघे आज हयात नाहीत़ त्यातले पप्या आणि राजू हे तर अकालीच गेलेले़आजही माझ्या कल्पनेतलं, आठवणीतलं भिडे बागेतलं जग बदललेलं नाही़ इथली घरं, माणसं रस्ते बदललेले नाहीत़ म्हणूनच त्यातलं या तिघांचं असणंही माझ्यासाठी भूतकाळात जमा झालेलं नाही़ भिडे बागेतल्या आठवणी जागवताना माझ्यासाठी तरी काळ पुढे सरकलेला नाही़ तो ३५ वर्षांपूर्वी जिथे होता, आजही त्याच जागी ठिप्या मारून बसलेला आहे़ त्या काळाला आकार देणारे क्षण माझ्यासाठी एका फ्रेममध्ये कायमस्वरूपी बंदिस्त झालेले आहेत़माझ्या आठवणीप्रमाणे १९८४-८५ ते ९१-९२ अशी साधारण सहा-सात वर्ष आम्ही भिडे बागेत राहिलो. राहायला आलो तेव्हा आमची वयं (मी आणि नानू-समीर) १२-१४च्या आसपास होती़ भिडे बाग सोडली, तेव्हा आम्ही दोघं विशीच्या आतबाहेर होतो़ त्याही घटनेला आता, तब्बल ३० हून अधिक वर्ष लोटली आहेत़ ‘विनायक स्मृती, भिडे बाग, देवपूर, धुळे’ हा आमचा इथला पत्ता़ आमच्या आसपास बाळकाका वाणी, भालेराव, कुंभारे ही सहृदयी कुटुंबं. पण जसा ठावठिकाणा हलला़ हा पत्ता कालौघात मागे पडत गेला़ पण विस्मृतीत गेला नाही़ किंबहुना जेव्हा कधी आजही भाऊचा फोन येतो किंवा या ना त्या निमित्ताने कुणाशी तरी बोलणं होतं; त्यांच्या बोलण्यातून भिडे बागेतलं वर्तमान माझ्यापर्यत पोहोचत राहातं, तेव्हा-तेव्हा मेंदूतच्या स्मृतीच्या तारा नव्याने जोडल्या जातात़ जुन्या आठवणीना नव्याने उजाळा मिळतो़ त्या मनमुक्त दिवसातल्या कितीतरी घटना, त्या दिवसांत अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय प्रसंग एका पाठोपाठ डोळ्यापुढे येत राहतात़ मग मनात कुठेतरी जपून ठेवलेला भिडे बागेतल्या फोटोचा अमूर्त अल्बम मी उघडतो़ त्यातल्या एका पानावर चिकटलेल्या फोटोमध्ये पावसकरांचं सदासर्वकाळ स्वागतोत्सुक घर मला दिसत असतं़ घरात शांतपणे कामात मग्न असलेल्या काकू दिसत असतात़ दिवसभर प्रिटिंग मशीनवर काम करणारा भाऊ असतो़ जिन्याखालच्या नळावर भांड्या-भांड्याने बादली भरणाऱ्या आक्का असतात़ ऐन तरुण वयात आसपासच्या जगण्यातून स्वत:ला वेगळं काढत सात्विक नि शिस्तबद्ध जीवनशैली जगणारा, नेमकं आणि मोजकं बोलणारा पप्या असतो़ रात्रीच्या जेवणानंतर खिडकीलगतच्या पलंगावर एकटेच पत्ते खेळण्यात मग्न दादा (पावसकर) असतात. त्यांच्या आसपास बागडणाºया अण्णांच्या मुली, (माझी स्मृती दगा नसेल तर अनुक्रमे टोपण नाव- अनुक्रमे टिळक-डेंजर आणि मुकेश) असतात.मनात जपून ठेवलेल्या अमूर्त अल्बमच्या दुसºया पानावर चिकटवलेल्या एका फोटोमध्ये स्वत:चं वय विसरून आमच्यात मित्रांहून मित्र होऊन राहिलेले, मदतीस सदा तत्पर, मायाळू स्वभावाचे रामकाका असतात. आग्रही मतांचा, दणकेबाज आवाजाचा धनू असतो़ ‘जवाहर’च्या लॅबमध्ये त्याचं कामात पुढाकार घेणं असतं़ अल्बमच्या पुढच्या एका पानावर चिकटवलेल्या फोटोमध्ये शिस्तबद्ध स्कॉलर दिप्या (डॉ़दीपक कोेठावदे) घराच्या पायºया चढताना- उतरताना दिसत असतो़ घराबाहेर पडताना, न चुकता आधी भिंतीवर लावलेल्या वडिलांच्या तसबिरीला आणि मग खुर्चीत बसलेल्या आईच्या पायांना स्पर्श करून घराबाहेर पडणारा जग्या दिसत असतो़ पुढच्या फोटोत मोटारसायकलवरून भरधाव कुठे तरी जाणारा, कुठून तरी येणारा केदार दिसत असतो़ घराच्या गॅलरीत फेरफटका मारणारी त्याची आई, काका दिसत असतात़ अल्बममधल्या पुढच्या पानावरच्या फोटोमध्ये अभ्यासाचं गणित सांभाळून गल्लीत मनसोक्त मजा करणारे राहुल-अतुल-मिलिंद दिसत असतात़ चौकात उभा, मिश्किल चेहºयाचा शीघ्र कवी बापू दिसत असतो़ स्वत:च्याच बोलण्यावर थांबून थांबून हसणारा छोटू असतो़ वयाला साजलेशा स्वभावानुसार तावातावाने बोलणारा पिंट्या असतो़ आपली कामं सांभाळून क्रिकेट खेळून गेलेला साठे चाळीतला बेलबॉटममधला राजेश आणि कायम टॉपटीप, इस्त्रीतल्या कपड्यातला डॉक्टर होऊ घातलेला महेशही (घुगरी) असतो़माझ्या मनातल्या अल्बमची पुढची काही पानं गल्लीत मेमाने खेळल्या जाणाºया अंडरआर्म, ओव्हरआर्म क्रिकेटचा आठवणी जागवणाºया असतात़ त्यात चिवटपणे बॅटिंग करत, (खरं तर डावा हात बॅटच्या हॅडलवर आणि उजवा हात ब्लेडला धरून बॅटिंगची सवय असलेला) जिंकून देणारा आमच्यातला एकमेव शतकवीर पप्या असतो़ या टोकापासून त्या टोकापर्यंत लेग स्पिन करण्यात पटाईत केदार असतो़ (पूर्वार्ध)

 शेखर देशमुख