जळगाव : बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याचे सांगून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली सय्यद अलीम सय्यद शौकत पटवे (३४, रा.भडगाव) या तरुणाची पावणे दोन लाख रुपयात आॅनलाईन फसवणूक केल्याच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी शफिक मिरासाहेब शेख (२५, रा. भिवंडी, जि.ठाणे) व आबीद हारुण खान (२७, रा.भिवंडी) या दोघांना सोमवारी भिवंडी येथून अटक केली. संशयितांनी १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वेगवेगळ्या मोबाईलवर संपर्क साधून आंध्रा बॅँक व साऊथ इंडियन बॅँकेचे खाते क्रमांक देऊन त्यात वेळोवेळी पैसे टाकायला सांगितले. त्यानुसार सय्यद याने १ लाख ७५ हजार रुपये बॅँकेत भरले, मात्र त्याला कोणतेही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणाच्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.या दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणा-या भिवंडीच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 9:33 PM
बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याचे सांगून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली सय्यद अलीम सय्यद शौकत पटवे (३४, रा.भडगाव) या तरुणाची पावणे दोन लाख रुपयात आॅनलाईन फसवणूक केल्याच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी शफिक मिरासाहेब शेख (२५, रा. भिवंडी, जि.ठाणे) व आबीद हारुण खान (२७, रा.भिवंडी) या दोघांना सोमवारी भिवंडी येथून अटक केली.
ठळक मुद्दे जळगाव सायबर पोलिसांची कारवाईपावणे दोन लाखात घातला होता गंडा