दहीगाव, जि. जळगाव, दि. 17 - उघडय़ावर शौचास बसणे गावातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. उघडय़ावर शौचास बसले असता दोन वेळा सर्पदंश झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील दहीगाव येथे घडली. सर्पदंशानंतर तरुणास जळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आह़े चार महिन्यांपूर्वी हा तरुण उघडय़ावर शौचास बसला असतानाच त्याला सर्पदंश झाला होता़ यावल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होत़े त्यानंतर पुन्हा सोमवार, 17 रोजी सकाळी साडेनऊ वाजता गावाबाहेर हा तरुण उघडय़ावर शौचास बसला असतानाच त्याला पुन्हा पायाला सर्पदंश झाला़ विशेष म्हणजे बराच वेळ सापाने पायाला वेटोळा दिल्याने त्याने जिवाच्या आकांताने सापाला हातात धरून फेकल़ेदरम्यान, जखमी अवस्थेतील तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे लस उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल़े पुन्हा त्याच सापाने घेतला चावातरुणाच्या मते चार महिन्यांपूर्वी याच सापाने आपल्याला दंश केला होता व आताही याच सापाने आपल्याला चावा घेतल्याचे तरुणाचे आह़े
आता तरी बांधा शौचालयउघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध सर्वत्र गुन्हे दाखल होत आहेत तर अनुदान देऊनही नागरिक शौचालय बांधत नसल्याची स्थिती आह़े अशा प्रसंगानंतरही तरी किमान नागरिकांनी घरोघरी शौचालय बांधावे, असे आवाहन प्रशासनाने केले आह़े