विवेक ठाकरे याच्या आंदोलनामुळे राज्यस्तरावर बैठक घेण्यात आली होती, त्यात सोनाळकर दोन वर्षांपासून ऑडिट रिपोर्ट देत नसल्याने, त्यांच्याकडून २० लाख रुपये वसूल करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कंडारे यांनी सोनाळकरांना नोटीस बजावली होती. दरम्यान, सोनाळकर यांनी मिळकतीची संपूर्ण माहिती खडसे यांना दिली होती व त्यानंतर ॲड.कीर्ती पाटील यांच्या नावाने केंद्राकडे तक्रार करण्यात आली व तेथून चौकशीचे आदेश निघाले, असेही या पत्रात म्हटले आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक
तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी २३ मार्च, २०१९ रोजी उपसंचालक, सहकार व कृषी विभाग, नवी दिल्ली यांच्याकडे बीएचआर संदर्भात अहवाल पाठविला होता. त्यात अनेक बाबींवर ताशेरे ओढण्यात आले होते. तपास अधिकारी सुनील कुराडे यांच्याविषयीही यात तक्रारी होत्या. त्यानंतर पुन्हा राज्य शासनाने सुनील कुराडे यांनी केलेल्या तक्रारीची फेरचौकशी करण्यासाठी अपर पाेलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती झाली होती. त्यांनीही चौकशी अहवालात कुराडेंच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते व तसा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविला आहे.