ऑनलाईन लोकमत/सुनील साळुंखे शिरपूर, जि. धुळे, दि. 7 - देखभाल व दुरुस्तीअभावी थाळनेर येथील भुईकोट किल्ल्याची अवस्था बिकट झाली असून किल्ल्यातील माती, विटा बांधकामासाठी लंपास होऊ लागल्याने भुईकोट किल्लाच भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. या ऐतिहासिक ठेव्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी इतिहासप्रेमींकडून होत आहे. ताळनेर ते थाळनेरसातपुडा पर्वताच्या पायथ्याशी तापी नदीच्या काठी, उत्तरेस सुमारे 1500 वर्षापूर्वी वसलेले थाळनेर हे गाव असाव़े एके काळची राजधानी असलेल्या या ऐतिहासिक गावात हजिरे आजही साक्ष देत आहेत़ तापी काठावर वसल्यामुळे गावाचे जुने नाव ‘ताळनेर’ होते. येथील भुईकोट किल्ल्याच्या शेजारी ‘स्थालेश्वर’ हे प्राचीन शिवालयाचे मंदिर असल्याने ताळनेरचे नाव कालातंराने ‘स्थालेश्वर-थाळनेर’ असे झाले. आता हेच गाव थाळनेर म्हणून ओळखले जाते. वैभव संपन्न गाव थाळनेर हे जुने, ऐतिहासिक गाव, एके काळी शहर होत़े गवळी अहिर राजाची थाळनेर राजधानी होती़ 1697 मध्ये राजाच्या कारकिर्दीत मराठा सरदार नेमाजी शिंदे यांनी 8 हजार घोडे स्वारनिशी खान्देशातील नंदुरबार व थाळनेर ही शहरे लुटली़ त्या वेळी मुस्लीम सरदार हुसेन अलीखॉ यांचा पराभव करून त्याने थाळनेर येथून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांची लूट केली होती़ त्या लिखित घटनेवरून थाळनेर हे गाव वैभव संपन्न असल्याचे लक्षात येत़े पाडय़ा-पाडय़ातून विखुरले गाव तापी नदीच्या खो:यात वसलेले असल्यामुळे नाले पाडय़ा-पाडय़ांचे विखुरलेले आह़े त्यात दामरेशपाडा (दानशूरपाडा), कांरज्यापाडा, जमादारपाडा, खंडेरावपाडा, बाजारपेठ, नावाडीपाडा असे पाडय़ांतून हे गाव वसले आह़ेउत्खनन करताना सापडली काळ्या पाषाणाची मूर्तीतापी नदीचे पाणी सुलवाडे बॅरेजमुळे अडविले गेल्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहते. या परिसरातच 1950मध्ये भगवान विष्णूंची साडेपाच फुटाची काळ्या पाषाणाची आकर्षक मूर्ती उत्खनन करताना सापडली़ आजही या मूर्तीचे ग्रामपंचायतजवळील मंदिरात जतन करून ठेवले आह़े एकेकाळी राजधानीचे वैभव असलेला हा किल्ला आज भगAावस्थेत आह़े गावातील ही ऐतिहासिक वास्तू जोपासली गेली तर भावी पिढीच्या दृष्टीनेदेखील ते अधिक मार्गदर्शक ठरेल, असे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. भावी पिढीला ही ऐतिहासिक वास्तू काय आहे याची जाणदेखील होणार नाही, अशी अवस्था किल्ल्याची झाली आह़े किल्ला काढला पोखरून भुईकोट किल्ल्यात तटबंदी तसेच किल्ल्यावर पुरातन, विहिरी, कारंजे, हौद, धान्य साठवणीचे रांजण अवशेष पाहायला मिळतात. गावातील काही नागरिकांनी किल्ल्यास लालसेपोटी पोखरून काढला आह़े माती खणत मोठमोठे दगड व विटा वाहून नेण्याचे काम आजही सुरू आह़े त्यावर कोणाचे बंधन नसल्यामुळे किल्ल्याची दिवसागणिक दुरवस्था होत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच ‘स्थालेश्वर’ हे प्राचीन शिवालयाचे अप्रतिम मंदिर आह़े मंदिराच्या समोर अखंड मोठय़ा दगडावर कोरीव काम करून नंदी बसविलेला आह़े काळ्या पाषणाच्या दगडांनी हे मंदिर उभारले आह़े आजही हे मंदिर बघणा:यांना मनमोहक करून टाकत़े मंदिरात शिवाची पिंड आह़े किंबहुना या किल्ल्याचे हनन मोठय़ा प्रमाणावर होत आह़े त्यामुळे किल्ल्याचे बुरूज ढासळले आहेत़ किल्ल्याच्या भिंती पडल्या आहेत़थाळनेर ही फारूकी राजांची राजधानी होती़ खान्देश हा व्यापारासाठी ब:हाणपूरशी जोडला होता़ तालुक्यासाठी ही सांस्कृतिक बाब तसेच थाळनेर येथील ऐतिहासिक वास्तु हा आपला अमुल्य ठेवा आह़े परंतु शासनासह सर्वाचेच दुर्लक्ष झाल्याने तेथील वास्तुंचे जतन झाले नाही़ काळाच्या ओघात या वस्तु नामशेष होतील़ पुरातत्व खात्याने एक बोर्ड लावण्या पलिकडे काहीही केलेले नाही़ महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशात थाळनेर येथील किल्ला, हजिरे याची नोंद करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आह़े सुदैवाने पर्यटन मंत्रीपद जिल्ह्याला प्रथमत: लाभले आह़े त्यादृष्टीने अहिल्यादेवी होळकरांनी निर्मिलेल्या वास्तु, बोराडी परिसरात आढलेल्या ताम्रपाषाण युगातील मुत्र्या, मूळ बिजासनी मंदिर, गानकोकिाळा लता मंगेशरकरांचे आजोळ, नागेश्वर येथील पुरातन मंदिर इत्यादी गोष्टी प्राचीन वारसा या अंगाने महत्त्वाच्या आहेत़ पर्यटनाचा दृष्टीकोन ठेवून त्यांचा विकास होणे गरजेचे आह़े नूतन मंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पहावे अशी तालुकावासियांची अपेक्षा आह़े -डॉ़ फुला बागूल, शिरपूर
भुईकोट किल्लाच भुईसपाट होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 5:37 PM